भारतात मोठ्या प्रमाणात इंटरनेटचा वापर केला जातो. पत्ता विचारत फिरण्यापेक्षा अनेक जण जीपीएसची मदत घेऊन रस्ता शोधण्याचा प्रयत्न करतात, विशेष म्हणजे जीपीएस वापरून रस्ता शोधणा-या चालकांची संख्या अधिक आहे पण दुर्दैव म्हणजे या चालकांना नेमका या प्रणालीचा कसा वापर करायचा हेच माहित नाही. नुकतेच फोर्ड मोटारकडून करण्यात आलेले संशोधन प्रकाशित करण्यात आले असून यात ही बाब अधोरेखित करण्यात आली आहे.

वाचा : सेक्स, चॉकलेट आणि दारूपेक्षा लोकांना ‘ही’ गोष्ट अधिक प्रिय

फोर्डच्या संशोधनानुसार भारतातील दर १० चालकांपैकी ४ चालक रस्ता शोधण्यासाठी पूर्णपणे जीपीएसवर अवलंबून असतात. पण त्यांना त्याचा नेमका वापर कसा करायचा हेच ठाऊक नसते त्यामुळे अनेकदा ते भरकटतात. चालक इच्छित स्थळी  पोहचण्यासाठी या जीपीएसची मदत घेतात पण यातल्या अनेक पर्यायांचा वापर कसा करायचा हे त्यांंना समजत नाही असे या संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे जीपीएस वापरणा-या ७५ टक्के चालकांना त्याचा वापर योग्य पद्धतीने कसा करायचा हे माहित नसल्याचे यासंशोधनात म्हटले आहे. तसेच ९६ टक्के भारतीय चालकांना गाडी योग्य पद्धतीने कशी चालवायची हे माहित असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. तर एक चतुर्थांश चालकांना गाडीचे इंधन कसे वाचवायचे हे माहिती आहे. सिग्नल किंवा ट्रॅफिकमध्ये गाडीचे इंजिन बंद करुन इंधन वाचवता येते असेही त्यांनी संशोधनात सांगितले. जगभरातील ९ हजारांहूनही अधिक चालकांनी या संशोधनात सहभाग घेतला होता.

वाचा : भारतीय कर्मचा-यांना कामापेक्षा ‘या’ गोष्टीत जास्त रस