नोटाबंदीच्या निर्णयानंतर सगळ्यात जास्त हाल झालेत ते लग्नघरांचे. लग्नसराईचे दिवस सुरु आहे अशातच नोटांबदीच्या निर्णयामुळे पैशांचे व्यवहार कसे करायचे असा प्रश्न लग्न घराला पडला आहे. कपडे, दागिने, आचारी, हॉलपासून कित्येकांचे पैसे थकले आहेत. ५०० आणि १००० च्या नोटा बंद झाल्याने त्यांचे पैसे द्यायचे कसे अशा अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. म्हणूनच ज्यांच्या घरात लग्न आहे अशांसाठी सरकारने बँकेतून पैसे काढण्यासाठी नव्या उपाययोजना आणल्या आहेत. तर दुसरीकडे वधुचे हाल होऊ नये यासाठी एका ब्युटीशिअने वधुला लग्नातील मेकअपसाठी ईएमआयची सोय उपलब्ध करुन दिली आहे.

वाचा : आहेराची चिंता मिटली

नोटाबंदीच्या निर्णयामुळे वधुला फटका बसू नये यासाठी ब्युटीएक्सपर्ट भारती तनेजा यांनी आपल्या पार्लरमध्ये येणा-या वधुसाठी ईएमआयची सोय उपलब्ध करुन दिली आहे. लग्नातील वधुच्या मेकअपचा खर्च हा सर्वाधिक असतो. अनेक ब्युटीशिअन यासाठी १५ हजारांपासून ते १ लाखांपर्यंत रक्कम घेतात. पण नोटांबदीच्या निर्णयानंतर आणि बँकेतून पैसे काढण्यावर मर्यादा घातल्यानंतर याचा परिणाम लग्नसराईवरही होऊ लागला आहे . तेव्हा आयुष्यात एकदाच येणा-या या खास क्षणांमध्ये वधुने तडजोड करू नये साठी भारती तनेजा यांनी आपल्या पार्लरमध्ये येणा-या वधुंना ईएमआयची सोय उपलब्ध करून दिली आहे. याचे पैसे वधुने पुढील ६ महिन्यांत किंवा वर्षभरात या पार्लरकडे जमा करायचे आहेत. त्यांच्या पार्लरमध्ये येणा-या अनेक ग्राहकांसाठी देखील त्यांनी ईएमआयची सोय उपलब्ध करून दिली आहे.

वाचा : होऊ दे खर्च ! ५०० कोटींचा शाही विवाहसोहळा

नोटाबंदीच्या निर्यणानंतर बँकेतून पैसे काढण्यावर सरकारने आणि आरबीआयने मर्यादा घालून दिल्यात. पण लग्नसराईचे दिवस लक्षात घेता फक्त ज्यांच्या घरात लग्न आहे अशांसाठी बँकेतून पैसे काढण्यावरच्या मर्यादा वाढवण्यात आल्या आहे. त्यामुळे लग्नासाठी नागरिक २.५ लाखांपर्यंतची रक्कम बँकेतून काढून शकतात. यासाठी काही अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

वाचा : लग्नात असे खर्च झाले ५०० कोटी रुपये