काबूल विमानतळावरील फोटो, व्हिडीओ गेल्या आठवड्यात झालेल्या अफगाणिस्तानावरील संकटाची निर्णायक प्रतिमा बनले आहेत. तथापि, अफगाणिस्तानच्या इतर भागांमधून फारसे वृत्त आलेले नाही. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील स्पिन बोल्डक सीमेवरचा नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये हजारो अफगाणी तालिबानी राजवटीतून सुटण्यासाठी दरवाजांवर थांबलेले दिसत आहेत. काबूलमध्ये जसं दृश्य होत तसचं दृश्य दिसून येत आहे. तथापि, अहवालांमध्ये असे म्हटले आहे की या भागात परिस्थिती खूपच वाईट आहे.

हा व्हिडीओ शेअर करणारे फ्रीलान्स पत्रकार लिहतात की, “हे काबूल विमानतळ नाही, ही स्पिन बोल्डक बॉर्डर आहे जिथे हजारो लोकांना अफगाणिस्तानातून पाकिस्तानात जायचे आहे. येथील परिस्थिती काबूल विमानतळावरील परिस्थितीपेक्षा खूपच वाईट आहे परंतु येथे कोणतेही परदेशी सैन्य नसल्याने ते माध्यमांनी कव्हर केले नाही.”

तालिबानच्या राजवटीतून सुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या हताश अफगाणांची मोठी गर्दी पाकिस्तानसह अन्य शेजारच्या देशांमध्ये प्रवेश करण्यासाठी आहे. ते अफगाणिस्तानच्या सीमावर्ती ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेच्या स्पिन बोल्डकच्या सीमा गेटवर शेकडो, हजारो लोक बसलेले दिसत आहेत, जे युद्धग्रस्त देशातून बाहेर पडण्याची वाट पाहत आहेत.

नेटीझन्सच्या प्रतिकिया

काही नेटीझन्सनी हा व्हिडीओ जुना असल्याचंही कमेंट करत सांगितलं आहे. एक वापरकर्ता लिहतो की, “हा जुना व्हिडीओ आहे. जेव्हा तालिबानने स्पिन बोल्डक काबीज केले आणि पाकिस्तानने दरवाजा बंद केला. जर हाच रस्ता अशरफ घनी यांच्या सरकारच्या काळात बंद झाला असता तर तोही तसाच असता. कारण तालिबानसाठी सुद्धा हजारो लोक दररोज या मार्गावर ये -जा करत असत.” तर दुसरा वापरकर्ता लिहतो की, “जेव्हा तालिबान त्यांच्या नागरिकांना पूर्ण सुरक्षा आणि सर्व अधिकार देत असतात, तेव्हा हे घडणे विचित्र आहे, यामागे काहीतरी आहे.”

काबूल १५  ऑगस्ट रोजी तालिबानच्या हाती पडल्यानंतर अफगाणिस्तानातून लोकांना बाहेर काढणाऱ्या कोणत्याही विमानात बसून देश सोडायचा प्रयत्न तिकडचे लोक करत आहेत. काबूल विमानतळाकडे धाव घेत असलेल्या अफगाण नागरिकांचे फोटो, व्हिडीओ रोज व्हायरल होत आहेत. काही पुरुष १६  ऑगस्ट रोजी अमेरिकन हवाई दलाच्या जेटच्या चाकांवर लटकलेले दिसले होते. तो व्हिडीओही व्हायरल झाला होता.

तुम्हाला काय वाटत या व्हिडीओबद्दल?