News Flash

‘अलिबाबा’चा ऑनलाइन धमाका, एकदिवसीय सेलमधून २ लाख १८ हजार कोटींची कमाई

केवळ २४ तासांसाठी ठेवलेल्या या सेलमधून अलिबाबानं एवढी मोठी कमाई केली आहे.

दरवर्षी ११ नोव्हेंबरला अलिबाबा या चीनमधल्या सर्वात मोठ्या ई-कॉमर्स साइटकडून ग्राहकांसाठी सेलचं आयोजन करण्यात येतं. यावर्षीदेखील या ई- कॉमर्स साइटनं ग्राहकांना घसघशीत सवलत दिली होती. या सवलतीचा फायदा घेत अनेकांनी खरेदी केली. केवळ २४ तासांसाठी ठेवलेल्या या सेलमधून अलिबाबानं थोडे थोडके नाही तर तब्बल २ लाख १८ हजार कोटींहून अधिकची कमाई केली आहे.

११ नोव्हेंबर हा दिवस चीनमध्ये ‘सिंगल्स डे’ म्हणून साजरा केला जातो. ‘व्हेलेंटाइन डे’चा बरोबर उलट हा दिवस असतो. या दिवशी अनेक कंपनी, दुकानं ग्राहकांना खरेदीवर सूट देतात. गेल्या काही वर्षांत इथे समीकरण इतकं बदललं की ‘सिंगल्स डे’ हा भरघोस सवलतीचा दिवस म्हणूनच ओळखला जाऊ लागला. अन्य दिवसांच्या तुलनेत या दिवशी खरेदीवर मोठी सूट देण्यात येते, म्हणूनच खरेदीचं प्रमाणही वाढतं. अलिबाबाकडून यंदा ग्राहकांना मोबाईल फोन, फर्निचर, कपडे सारख्या अन्य उत्पादनांवर मोठी सूट दिली होती. या सवलतीचा फायदा घेत लाखो लोकांनी खरेदी केली.

या व्यवहारातून अलिबाबानं २ लाख १८ हजार कोटींहून अधिकची कमाई केली. चीनमधील कोसळणारी अर्थव्यवस्था, वाढती महागाई, वाढता आयातदर या कशाचाच परिणाम अलिबाबाच्या ‘सेल’ वर झालेला नाही. उलट गतवर्षाच्या तुलनेत खरेदीत वाढ झाल्याचं समजत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2018 4:40 pm

Web Title: alibaba makes record 30 billion during 24 hour singles day online sale
Next Stories
1 पुणे : रस्त्यावर थुंकताय, सावधान!, होऊ शकते थुंकी साफ करण्याची शिक्षा
2 प्रेरणादायी नाही तर वेदनादायी निघालं त्या व्हिडिओमागचं सत्य
3 ‘शाह हे नाव भारतीय नाही; भाजपाने अमित शाह यांचंही नामांतरण करावं’
Just Now!
X