News Flash

‘या’ फोटोमध्ये लपलेला सरडा शोधून दाखवण्याचं Challenge स्वीकारता का?

अनेकांनी या फोटोत सरडा शोधण्याचा प्रयत्न केला पण...

सरडा शोधून दाखवाच

सरडा म्हटल्यावर अनेकांना भिती वाटते. अनेकजण सरडा किंवा पालींना घाबरतात. यासंदर्भातील अनेक मिम्सही आपल्याला सोशल नेटवर्किंगवर पाहायला मिळतात. मात्र सध्या सोशल नेटवर्कींगवर अनेकजण एका सरड्याच्या मागे लागले आहेत. त्याला कारणही तसे खास आहे. इंटरनेटवर अनेकदा ऑप्टीकल इल्यूजन म्हणजेच दृष्टीभ्रम निर्माण करणारे फोटो शेअर होताना दिसतात. असाच एका सरड्याचा फोटो सध्या व्हायरल झाला आहे.

ट्विटवरील एरियान मॅकगी या जीवशास्त्राच्या विद्यार्थिनीने ट्विट केलेल्या एका फोटोमध्ये तिने सरडा शोधून दाखवा असं आवाहन तिच्या फॉलोअर्सला केलं आहे. या फोटोमधला सरडा शोधून दाखवा असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. या फोटोवर शेकडो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अनेकांनी मॅकगीने दिलेल्या वेळेत सरडा शोधण्याचा प्रयत्न करुन प्रतिक्रिया दिली. काहींनी हे जरा अवघड असल्याचे सांगत मजेदार ट्विटस केले.

तुम्ही शोधा मी वाट बघेन

हे किंवा ते शोधा

मिळाला

भारीय हे

सापडला मला सरडा

हा घ्या

शेकडो जणांनी प्रयत्न करुन काहींना सरडा सापडल्याचे त्यांनी सांगितले पण कोणालाच हा सरडा फोटोमध्ये दाखवता आला नाही. त्यामुळेच अखेर मॅकगीनेच सरडा कुठे आहे हे फोटो पोस्ट करुन सांगितले.

अनेकांनी मॅकगीने सरडा दाखवल्याबद्दल तिचे आभार मानले आहेत. ‘मी आणि माझी पत्नी बराच वेळ सरडा शोधत होतो. उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद,’ असं एका युझरने या फोटोवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. तर दुसऱ्या एक युझरने, ‘मी हे बराच वेळ पाहिले पण सरडा सापडला नाही. तू तो दाखवल्याबद्दल धन्यवाद,’ असं म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 11:08 am

Web Title: can you find the lizard hiding in this picture its tougher than you think scsg 91
Next Stories
1 महाराष्ट्रात मी फिरायला कुठे जाऊ शकतो?? अजिंक्य रहाणेला हवी आहे तुमची मदत
2 कृपा करा, प्रशिक्षकासाठी अर्ज करु नका ! जसप्रीत बुमराहला सल्ला देणारे संजय मांजरेकर ट्रोल
3 सुर्याचा पृष्ठभाग की लोणावळा चिक्की?; नेटकऱ्यांना पडला प्रश्न
Just Now!
X