अनेक गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोन महत्वाचा असतो असं म्हणतात. म्हणजेच एकच गोष्ट दोन वेगवेगळ्या पद्धतीने पाहिल्यास तिच्यामधून वेगळा अर्थ निघू शकतो. अनेकदा एखाद्या गोष्टीकडे पाहताना दिसतं तसं नसतं याचा प्रत्यय येतो. अनेकदा या ऑप्टीकल इल्यूजनमुळे (म्हणजेच दृष्टीचा होणार भ्रम) गोंधळ उडतो. सध्या इंटरनेटवर अशाच एका फोटोची चर्चा आहे. तुम्हाला तुमच्या बुद्धीला चालना द्यायची असेल किंवा काहीतरी आव्हानात्मक ऑनलाइन चॅलेंज वगैरे स्वीकारायचं असेल तर ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच स्मृती भ्रमाशीसंदर्भातील चॅलेंज हा उत्तम पर्याय आहे. सध्या नेटकरी अशाच एका चॅलेंजमध्ये अडकल्याचे चित्र इंटरनेटवर दिसत आहे.

नक्की पाहा >> कोणी म्हणतं ब्लॅक ब्यूटी तर कोणी बगीरा… खरोखरच या फोटोंवरुन तुमची नजर हटणारच नाही

भारतीय वन विभागाच्या सेवेत असणारे अधिकारी प्रविण कासवान यांनी ट्विटवर दोन झेब्रा समोरासमोर उभे असल्याचा फोटो शेअर करत नेटकऱ्यांना चॅलेंज दिलं आहे. “चला या दोघांपैकी कोणता झेब्रा पुढे आहे हे कोण सांगू शकतं पाहुयात. हा फोटो सरोश लोधी या माझ्या मित्राने क्लिक केला असून त्यानेच मला यासंदर्भातील प्रश्न विचारला आहे,” अशी कॅप्शन दिली आहे. तुम्हीच पाहा हा फोटो आणि सांगा कोण पुढे कोण मागे..

अर्थात आता असं चॅलेंज आल्यावर या पोस्टवर नेटकऱ्यांच्या उड्या पडल्या. कोणी खरोखरच अंदाज व्यक्त केला तर कोणी डोकं गरगरायला लागल्याचं सांगत हे आम्हाला सांगणं शक्य होणार नाही असं मत व्यक्त केलं.

उजवा

शंभर टक्के डावा

नाही नाही उजवा…

नाही डावाच

काही लोकांनी तर आपल्या उत्तराचे स्पष्टीकरणही दिलं. हे पाहा…

सावली पाहून वाटत आहे की

डावा वाटतोय कारण…

कान पाहिल्यावर असं दिसत आहे की…

सावली पाहता

केसांकडे लक्ष दिल्यास…

याने जरा जास्तच संशोधन केलं

काहींनी तर नादच सोडून दिला आणि म्हणून लागले डोळे दुखू लागले झेब्रा पाहून पाहून. ही पाहा काही उदाहरणे…

माझे डोळे…

आधीच २०२० मध्ये कमी प्रश्न आहेत त्यात हा एक

डावा आणि उजवा पण कोणाचा?

काहींना तर हा फोटो एडिट केलेला वाटला

नक्की पाहा >> एकमेवाद्वितीय! भारतामध्ये पहिल्यांदाच आढळला ‘हा’ सुंदर प्राणी; पाहून व्हाल थक्क

हा फोटो काढला कसा?

वाइल्ड लाइफ फोटो ग्राफर असणारे सरोश लोधी यांनी हा फोटो क्लिक केला आहे. “आफ्रिकेमधील मसाई मारा येथील जंगलांमध्ये झेब्रांच्या एका कळपाचे काही फोटो मी काढत होतो. अनेक झ्रेबा असल्याने मी त्यांचे वेगवेगळ्या शैलीतील फोटो काढण्याचा प्रयत्न करत होतो. त्याचवेळी दोन झेब्रा एकमेकांकडे समोरासमोर चालत येताना दिसले. या दोघांमध्ये आता काहीतरी संवाद होईल असं वाटून मी फोटो क्लिक करत राहितो त्याचवेळी हा फोटो मी क्लिक केला. हे झेब्रा ज्या पद्धतीने उभे आहेत त्यामुळे हे इल्युजन तयार झालं आहे,” असं लोधी या फोटोबद्दल बोलताना सांगतात.

नक्की वाचा >> ऑप्टीकल इल्युजनचे आणखीन एक उदाहरण, हा फोटो रंगीत की ब्लॅक अँड व्हाइट?; सांगा पाहू

बरं कोणता झेब्रा पुढे हे उत्तर तुम्हाला सापडल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा.