भारत आणि चीनदरम्यान १५ जून रोजी पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या हिंसेमध्ये भारताचे २० जवान शहीद झाले. सोशल मिडियावर या हिंसेनंतर आता चिनी मालावर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं जात आहे. सोशल मिडियाबरोबरच रस्त्यावर उतरुन चिनी माल तसेच तेथील नेत्यांचे पुतळे जाळून अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आलं आहे. सोशल मिडियावरही चीन विरोध वाढताना दिसत आहे. अशातच आता भारतीयांनी चीनच्या सैन्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. चीनमधील सरकारी वृत्तपत्र असणाऱ्या एका व्हिडिओवर भारतीयांनी चिनी सैन्याला चांगलचं ट्रोल केलं आहे.

ग्लोबल टाइम्सने आपल्या ट्विटवरुन एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये चिनी लष्करामधील सैन्य बंदुका घेऊनच पॉवर नॅप म्हणजेच छोटी डुकली घेताना दिसत आहेत. झोपेत असणाऱ्या चिनी सैनिकांच्या बंदूका खेचण्याचा प्रयत्न केल्यास ते कशी प्रतिक्रिया देतात हे या व्हिडिओ दिसत. चिनी लष्कर किती सज्ज आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओमधून करण्यात आला आहे. “खडतर प्रशिक्षणानंतर झोपेत असतानाही ते त्यांच्या बंदुका कोणाला घेऊ देत नाहीत. चिनी सैनिकांसाठी बंदूक काय असते हे यावरुन समजतं,” असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे.

मात्र या व्हिडिओच्या तळाशी टिकटॉकचा लोगो दिसत असून हा व्हिडिओ खोटा असल्याचा आरोप भारतीयांनी केला आहे. हे केवळ एक नाटक असून व्हिडिओमधील सैनिक अभिनय करत असल्याचं भारतीय नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. भारतीयांबरोबरच परदेशी नागरिकांनाही चिनी लष्करातील सैनिक चांगला अभिनय करतात असा टोला लगावला आहे. पाहुयात काय म्हणणं आहे नेटकऱ्यांच..

१) एवढा अभिनय तो पण चिनी बंदुकांसाठी

२) चांगला अभिनय करता

३) आधी आणि नंतर

४) जपून राहा लय हाणतील

५) यांच्यापेक्षा ते बरे

६) ५० रुपये कापा

७) ते आठवतयं का?

८) एकानेच चांगला अभिनय केला

९) वा काय अभिनय केलाय

१०) टाळ्या

तुम्हालाही हा व्हिडिओ फेक वाटतोय का कमेंट करुन नक्की मांडा तुमचे मत