News Flash

मुंबईकर तरुणाने कोविड योद्ध्यांसाठी तयार केली कूल पीपीई किट

पीपीई कीटमधील ही वेंटिलेशन सिस्टम बॅटरीवर चालणारी आहे

फोटो सौजन्य - ऑल इंडिया रेडिओ फेसबुक

करोनाकाळात आरोग्य कर्मचारी गेल्या वर्षभरापासून न थकता काम करत आहेत. करोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना नेहमी पीपीई किट घालूनच त्यांच्यावर उपचार करावे लागत आहेत. हे पीपीई किट घालून दिवसभर आरोग्य कर्मचाऱ्यांना आपले कर्तव्य पूर्ण करावे लागत आहे. एकदा हे पूर्ण किट घातले तर आतमध्ये जराही हवा प्रवेश करु शकत नाही. त्यामुळे घामाने किटमधील व्यक्ती अक्षरशः भिजून जाते. मुंबईच्या एका विद्यार्थ्याने डॉक्टर असणाऱ्या आईला होणारा त्रास पाहून एक भन्नाट कल्पना शोधून काढली आहे. अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाला असणाऱ्या निहालने कूल पीपीई किटसाठी वेंटिलेशन सिस्टम तयार केली आहे.

मुंबईच्या के.जे. सोम्मया महाविद्यालयात शिकणाऱ्या निहाल सिहंने ‘कोव्ह-टेक’ नावाची कॉम्पॅक्ट आणि फ्रुगल इनोव्हेशन असणारी वायुवीजन प्रणाली पीपीई किटसाठी तयार केली आहे. करोनाकाळात काम करणाऱ्या आरोग्य सेवेतील कर्मचार्‍यांना मदत करण्यासाठी निहालने ही भन्नाट कल्पना शोधून काढली आहे.

कोव्ह-टेक वेंटिलेशन सिस्टम ही पीपीई किटच्या आत बसवलेली असते. ती सभोवतालची हवा फिल्टर करुन आतमध्ये ढकलते. जेणेकरुन आपण पंख्याखाली बसल्यासारखे वाटते असे निहालने सांगितले सामान्यत: हवा जाण्यासाठी मार्ग नसल्याने पीपीई किटमध्ये गरम आणि दमट वातावरण तयार होतं. कोव्ह-टेकमुळे स्थिर हवेचा प्रवाह तयार होतो त्यामुळे किटमधील व्यक्तीची अस्वस्थतेतून सुटका होते. या सिस्टममध्ये लिथियम-आयन बॅटरी लावण्यात आली. ६ ते ८ तास चालते.

टेक्नोलॉजिकल बिझिनेस इनक्यूबेटर, रिसर्च इनोव्हेशन इनक्युबेशन डिझाईन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेमुळे मला ही समस्या कळाली असे निहालने सांगितले.

पुणे येथील नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे डॉ. उल्हास खरुल यांच्या मार्गदर्शनाने निहालने २० दिवसांत किटचे पहिले मॉडेल बनवले. डॉ. उल्हास यांच्या मार्गदर्शनामुळे हवेच्या प्रवाह गुणवत्तेमध्ये संतुलन साधण्यासाठी कोणत्या प्रकारचे फिल्टर वापरावे याची कल्पना आली. त्यानंतर निहालला भारत सरकार अंतर्गत येणाऱ्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान उद्योजकता विकास बोर्ड (एनएसटीईडीबी) द्वारा मधीस सोमैया विद्याविहार विद्यापीठाच्या रिसर्च इनोव्हेशन इनक्युबेशन डिझाइन लॅबोरेटरी (आरआयआयडीएल) कडून मदत मिळाली. सहा महिन्यांहून अधिक प्रयत्नानंतर त्याने मानेभोवती उशीसारखी लावता येईल अशी यंत्रणा तयार केली. मात्र ही यंत्रणा त्रासदायक ठरत असल्याने आणखी लोकांची मदत घेत त्याने कमरेभोवती लावता येईल अशी वेंटिलेशन सिस्टम तयार केली. पुण्याच्या एका रुग्णालयात याची चाचणी केल्यानंतर ती यशस्वी ठरली आहे. जून महिन्यात एका कंपनीमार्फत याची मोठ्या प्रमाणावर निर्मिती केली जाणार आहे. ५,४९९ इतकी याची किंमत असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2021 3:08 pm

Web Title: cool ppe kit for covid warriors student from mumbai abn 97
Next Stories
1 Video : NICU मध्ये रात्री रडणाऱ्या चिमुकल्याला शांत करण्यासाठी डॉक्टरांनी गायलं गाणं; अन् …
2 Video: संसदेचा सेंट्रल हॉल ते अमेरिका… सात वर्षांमध्ये मोदी कधी आणि कुठे कुठे भावूक झाले?
3 Viral Video: हा हळदी समारंभ पाहून ‘हेच पहायचं बाकी होतं’ अशीच तुमची पहिली प्रतिक्रिया असेल
Just Now!
X