22 January 2021

News Flash

Viral Video : जंगलात थेट सिंहाशी भिडला कुत्रा, पुढे काय झालं ते एकदा बघाच

जंगल सफारीसाठी गेलेल्या काही पर्यटकांच्या जीपसमोरच घडली घटना

तुम्ही कधी जंगलात कुत्रा आणि सिंहाची लढाई बघितलीये? कुत्र्यासमोर सिंहाने पराभव स्वीकारल्याचं कधी बघितलंय का…? असाच एक हैराण करणारा व्हिडिओ इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसचे अधिकारी प्रविण कासवान यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय. ‘जीवनात इतक्या आत्मविश्वासाची आवश्यकता आहे’, असं कॅप्शनही त्यांनी या व्हिडिओसोबत दिलंय.

जंगल सफारीसाठी गेलेल्या काही पर्यटकांच्या जीपसमोरच ही घटना घडली. हा व्हिडिओ नेमका कुठलाय हे अद्याप समजू शकलेलं नाही पण पर्यटकांनी या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय. ज्या सिंहाचं नुसतं नाव ऐकून धडकी भरते त्या सिंहाने एका कुत्र्यावर झडप घातली. पंजा मारुन हा सिंह कुत्र्याला लोळवतो. पण लगेच कुत्रा उठून उभा राहतो आणि जोरजोरात सिंहावर भुंकायला सुरूवात करतो आणि धावत थोडा पुढे निघून जातो. नंतर मागे वळून तो पुन्हा सिंहाकडे बघतो, सिंह तिथेच उभा असतो. सिंह त्याला घाबरवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकतो ते बघून कुत्रा कसलाही विचार न करता जोरजोरात भुंकत थेट सिंहावर धावून जातो. आश्चर्य म्हणजे कुत्रा येत असल्याचं बघून जंगलाचा राजा चक्क मागे जातो. हल्ला करण्याऐवजी एक-एक पाय मागे टाकत हा सिंह कुत्र्याकडे फक्त बघत बसतो. सिंह मागे हटल्याचं लक्षात येताच कुत्रा पुन्हा आपला रस्ता पकडतो आणि धूम ठोकतो. कुत्रा गेल्यानंतर अजून एक सिंह तिथे येतो, दुसरा सिंह आल्याचं बघून पहिला सिंह कुत्रा गेला त्या मार्गाने जाऊन पुन्हा त्याला शोधण्याचा प्रयत्न करतो, पण तोपर्यंत कुत्रा गायब झालेला असतो. बघा व्हिडिओ :


दरम्यान, प्रविण कासवान यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

 

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2021 11:35 am

Web Title: dog scares away lion in fierce battle viral video sas 89
Next Stories
1 दोन दिवसांपासून सूर्य दिसला नाही, मोदींनी विकला तर नसेल ना?, ‘हिवसाळ्या’वरुन नेत्याचा खोचक टोला
2 ऐकावं ते नवल…लग्नात पाहुणा म्हणून गेला, पण नवरा बनून आला!
3 जसप्रीत बुमराहने उडवली स्टिव्ह स्मिथची खिल्ली, व्हिडिओ झाला व्हायरल
Just Now!
X