News Flash

‘चित्राच्या बदल्यात सोन्याचा कमोड चालेल का?’, संग्रहालयाचा ट्रम्पनां प्रस्ताव

त्यांनी जगप्रसिद्ध चित्रकाराचं चित्र मागवलं होतं

ट्रम्प यांची मागणी संग्रहालयानं फारशी गांभीर्यानं न घेता हे चित्र त्यांना देण्यास नकार दिला.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी एखादी गोष्ट मागितली आणि ती त्यांच्या समोर हजर झाली नाही असं फार क्वचितच घडलं असेल. पण नुकताच एका संग्रहालयानं त्यांना जगप्रसिद्ध चित्र देण्यास नकार दिला असून त्याऐवजी संग्रहालयात असणारा सोन्याचा कमोड व्हॉईट हाऊसमध्ये घेऊन जा असा प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवला आहे.

ट्रम्प यांनी न्यूयॉर्कच्या गुगनहाइम संग्रहालयाकडे एक मागणी केली होती. प्रसिद्ध चित्रकार व्हॅन गॉगचं ‘लँडस्केप विथ स्नो’ हे जगप्रसिद्ध चित्र काही काळासाठी व्हाईट हाऊसकडे देण्यात यावं अशी मागणी काही महिन्यांपूर्वी त्यांनी केली होती. व्हॅन यांनी १८८८ मध्ये हे चित्र रेखाटलं होतं. ट्रम्प यांची मागणी संग्रहालयानं फारशी गांभीर्यानं न घेता हे चित्र त्यांना देण्यास नकार दिला आहे. पण, राष्ट्राध्यक्षांचं मन राखण्यासाठी त्यांनी चित्राच्या बदल्यात संग्रहालयातील सोन्याचा कमोड देण्याचा प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवला आहे. व्हाईट हाऊसची सजावट करण्यासाठी देशातील वेगवेगळ्या संग्रहालयांकडून काही वस्तू उसन्या घेतल्या जातात. राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ संपल्यावर त्या परतही केल्या जातात.

Viral Video : दुचाकीस्वाराला दोन वाघांनी घेरलं, सुटकेचा थरार व्हायरल

तीन हात, तीन पाय, हॉलिवूडच्या प्रसिद्ध मासिकाचा सर्वात मोठा घोळ

म्हणून व्हाईट हाऊसकडून हे जगप्रसिद्ध चित्र मागण्यात आलं होतं. पण त्याबदल्यात गुगनहाइम संग्रहालयानं इटालियन आर्टिस्ट मौरिजियो केटिलेन यानं तयार केलेला सोन्याचा कमोड व्हाईट हाऊसला देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. २०१६ साली गुगनहाइम संग्रहालयात हा कमोड बसवला होता, त्यानंतर काही काळसाठी तो सार्वजनिक वापरासाठीही खुला केला होता. व्हाईट हाऊसकडून अद्यापही यावर उत्तर आलं नाही पण, अनेकांनी ट्विटरवर मात्र गुगनहाइमच्या प्रस्तावाचा विरोध केला आहे. हा प्रस्ताव ठेवून राष्ट्राध्यक्षांचा अपमान संग्रहालयानं केला असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2018 5:37 pm

Web Title: donald trumps asked for van gogh painting for white house museum offered gold toilet instead
Next Stories
1 ९० वर्षांच्या जनाबाईही देतायंत कौमार्य चाचणी विरोधातील लढा!
2 Viral Video : दुचाकीस्वाराला दोन वाघांनी घेरलं, सुटकेचा थरार व्हायरल
3 तीन हात, तीन पाय, हॉलिवूडच्या प्रसिद्ध मासिकाचा सर्वात मोठा घोळ
Just Now!
X