News Flash

‘५० रुपयांचं रिचार्ज करून फालतूचं ज्ञान पाजळू नको’, शेतकरी आंदोलनावरुन ट्रोल करणाऱ्याला कपिल शर्माचं सणसणीत उत्तर

शेतकरी आंदोलन : 'चुपचाप कॉमेडी कर' म्हणणाऱ्याला कपिलने सुनावलं; म्हणाला... "देशभक्त लिहिल्याने कोणी देशभक्त होत नाही...

(संग्रहित छायाचित्र)

केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी आक्रमक झाले असून आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला देशाच्या विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी समर्थन दिलंय. प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा यानेही एक ट्विट करत या आंदोलनाबाबत आपलं मत मांडलं, त्यावर एका नेटकऱ्याने कपिलला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र कपिलनेही सणसणीत प्रत्युत्तर देत ट्रोलरची बोलतीच बंद केली.

“शेतकऱ्यांच्या मुद्द्याला राजकीय रंग न देता चर्चेने हा मुद्दा निकाली काढायला हवा. चर्चेने सुटू शकत नाही असा कोणताही मुद्दा नसतो. आम्ही सर्व देशवासी शेतकरी बांधवांच्या सोबत आहोत. तो आमचा अन्नदाता आहे”, अशाप्रकारचं ट्विट करत कपिल शर्माने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला एकप्रकारे आपला पाठिंबा दिला.

कपिल शर्माच्या या ट्विटवर जिगर मेवात नावाच्या एका युजरने कपिलला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्याने कपिलच्या ट्विटला रिप्लाय देत, चुपचाप कॉमेडी कर…जे तुझं काम आहे त्यावर लक्ष दे असं म्हटलं. या युजरने हिंदीमध्ये ‘कॉमेडी कर चुप चाप, राजनीति करने की कोशिश मत कर। ज़्यादा किसान हितैषी बनने की कोशिश मत कर, जो तेरा काम है, उस पर फोकस रख।’ असं ट्विट केलं.

युजरच्या या ट्विटवर कपिलही शांत बसला नाही आणि त्यानेही सणसणीत उत्तर दिलं. “मी माझं कामच करतोय…तुम्हीही तुमचं काम करा….देशभक्त लिहिल्याने कोणी देशभक्त होत नाही…काम करा आणि देशाच्या विकासामध्ये हातभार लावा…५० रुपयांचं रिचार्ज करुन फालतूचं ज्ञान पाजळू नको… धन्यवाद”, असं उत्तर कपिलने दिलं. “भाई साहब मैं तो अपना काम कर ही रहा हूँ, कृपया आप भी करें, देशभक्त लिखने से कोई देशभक्त नहीं हो जाता, काम करें और देश की तरक़्क़ी में योगदान दें 50 rs का रीचार्ज करवा के फ़ालतू का ज्ञान ना बांटे। धन्यवाद” असं ट्विट हिंदीमध्ये करत कपिलने ट्रोलरची बोलतीच बंद केली.

पाहा फोटो >> अन्नदाता रस्त्यावर… थंडीमध्ये कुडकुडत आंदोलक शेतकऱ्यांनी घालवली रात्र

दरम्यान, पंजाब-हरयाणाचे शेतकरी गेल्या ४ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर ठिय्या मांडून बसले असून जंतर-मंतरवर आंदोलन करण्याला परवानगी द्यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2020 8:48 am

Web Title: dont preach to us with your rs 50 recharge kapil sharma hits back after troll tells him not to defend farmers stick to comedy sas 89
Next Stories
1 IPL मध्ये अपयशी ठरलेला मॅक्सवेल ऑस्ट्रेलियात चमकला, वासिम जाफर म्हणतो…गुन्हा है ये !
2 Video : क्रिकेटच्या मैदानावर प्रेमाला बहर, भारतीय चाहत्याची ऑस्ट्रेलियन गर्लफ्रेंडला लग्नाची मागणी
3 Video : भगव्या झेंड्याने वाढवली सिडनीची शान, ऑस्ट्रेलियात छत्रपतींचा जयघोष
Just Now!
X