मागील काही दिवसांपासून सर्वच राज्यांची पोलीस दल हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्याचे दिसून येत आहे. मुंबई पोलीस असतील किंवा अन्य महानगरांचा पोलीस विभाग असेल ट्विटरच्या माध्यमातून जनतेच्या संपर्कात राहण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. सध्या चर्चेचा विषय ठरत आहे ते म्हणजे मेघालय पोलिसांनी केलेलं ट्विट. अमली पदार्थांच्या ऐवजी मेघालयात अंमली पदार्थ विकणारे रसनाची पावडर विकत असल्याचं ट्विट मेघालय पोलिसांनी केलं आहे. त्यांनी केलेलं ट्विट पाहून कोणालाही हसल्याशिवाय राहवणार नाही.

यापूर्वी आसाम पोलिसांनी एका अनोख्या अंदाजात गांजा पकडल्याची माहिती दिली होती. आसाम पोलिसांनी आपल्या कामगिरीची बातमी देण्यासाठी एक ट्विट केलं होतं. ज्यांचा गांजा हरवला आहे त्यांनी काळजी करू नये, थेट आमच्याशी संपर्क साधावा, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलं होतं. शिवाय या बरोबर डोळा मारणारा इमोजी देखील शेअर केला होता. यानंतर आता मेघालय पोलिसांनी केलेल्या ट्विटची सध्या चर्चा सुरू आहे.