दुबईचे क्राऊन प्रिन्स, शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम हे सोशल मीडियावर बरेच सक्रीय असतात. आपले फोटो, व्हिडिओ ते सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असतात. त्यांनी नुकताच एक नवीन व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये त्यांनी सर्वात वेगवान धावणारा पक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहामृगासोबत शर्यत लावल्याचं दिसतंय.

व्हिडिओमध्ये क्राऊन प्रिन्स आपल्या मित्रांसोबत सायकलिंग करताना दिसत आहेत. पण काही सेकंदांनंतर व्हिडिओमध्ये एक शहामृग समांतर रस्त्यावर धावताना दिसतोय. त्याच्याकडे बघून क्राऊन प्रिन्स जोरजोरात सायकलचे पॅडल मारतात, काही सेकंदांसाठी ते शहामृगाच्या पुढेही जातात पण काही क्षणातच शहामृग त्यांना मागे टाकतो आणि रस्ता पार करुन दुसऱ्या बाजूला येतो. हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होतोय. बघा व्हिडिओ :

MS Dhoni Review System as Umpire Gives Wide Ball in CSK vs LSG match IPL 2024
IPL 2024: धोनी रिव्ह्यू सिस्टीम! पंचांचा निर्णय अन् लगेचच माहीचा रिव्ह्यूसाठी इशारा, पाहा काय घडलं?
Double MA and PhD Lady Selling tea on road
MA, Ph.D ची डिग्री असूनही विकतेय रस्त्यावर चहा, महिलेनी सांगितले कारण, VIDEO Viral
NASA captures mysterious ‘surfboard-shaped’ object orbiting moon
चंद्राभोवती घिरट्या घालतेय UFO? नासाने शेअर केला रहस्यमयी फोटो, नक्की काय आहे प्रकरण?
Zomato account suspension leaves delivery agent in tears on eve of sister’s wedding
बहिणीच्या लग्नाआधीच बंद झालं डिलिव्हरी बॉयचं खातं; ढसा ढसा रडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ पाहून झोमटोने दिले उत्तर

 

View this post on Instagram

 

A post shared by Fazza (@faz3)


दरम्यान, काही महिन्यांपूर्वी क्राऊन प्रिन्स यांनी एका पक्ष्याच्या घरट्यासाठी आपली लग्जरी मर्सिडीज एसयूव्ही वापरणं बंद केलं होतं. त्या घरट्यात पक्षाने अंडे दिले होते. त्यामुळे, मकतूम यांनी घरटं न हटवता थेट ती एसयूव्हीच न वापरण्याचा निर्णय घेतला आणि ती गाडी एका बाजूला उभी केली. याशिवाय गाडीच्या जवळपास कोणी जाणार नाही याचीही खबरदारी त्यांनी घेतली. जोपर्यंत अंड्यांमधून पिल्लं बाहेर पडत नाहीत तोपर्यंत गाडी वापरणार नाही असं त्यांनी त्यावेळी एक व्हिडिओ जारी करुन सांगितलं होतं. पक्ष्याच्या अंड्यांसाठी घरटं न हटवता थेट ती एसयूव्हीच न वापरण्याचा निर्णय घेतल्यानंतर क्राऊन प्रिन्स मकतूम यांच्यावर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव झाला होता.