News Flash

‘तारक मेहता….’ मधला जेठालाल दिवसभर ट्रेंडिगला….त्याच्यावरचे मीम्स पाहून पोट दुखेपर्यंत हसाल!

आज या अभिनेत्याचा वाढदिवस असल्याने त्याच्या चाहत्यांनी हा हॅशटॅग ट्रेंडिगवर आणून ठेवला आहे.

‘तारक मेहता….’ मधला जेठालाल दिवसभर ट्रेंडिगला….त्याच्यावरचे मीम्स पाहून पोट दुखेपर्यंत हसाल!

आज दिवसभर ट्विटरवर एक हॅशटॅग ट्रेंडिंगला दिसत आहे. हा हॅशटॅग म्हणजे #jethalal. तारक मेहता का उल्टा चश्मा या लोकप्रिय मालिकेमधलं जेठालाल हे महत्त्वाचं पात्र साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांचा आज वाढदिवस असल्यानं हा हॅशटॅग ट्रेंडिंग आहे. या हॅशटॅगच्या माध्यमातून जेठालालचे चाहते त्यांना शुभेच्छा देत आहेत. शुभेच्छांसोबतच अनेक मीम्स प्रचंड व्हायरल होत आहेत.
दीर्घकाळ चालत असलेली हा मालिका अनेकांच्या आवडीची आहे. आपण ही मालिका बघतच मोठे झालो आहोत, अशी भावनाही अनेकजण व्यक्त करत आहेत. या मालिकेतलं जेठालाल हे पात्र साकारणाऱ्या दिलीप जोशींचेही लाखो चाहते आहेत. या चाहत्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक मीम्स करत हा हॅशटॅग ट्रेंड केला आहे. पाहूयात यापैकी काही मीम्स-


या मालिकेत हा जेठालाल एका इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानाचा मालक असतो. त्याची पत्नी दया, वडील चंपकलाल आणि मुलगा टप्पू यांच्या भोवती फिरणारी या मालिकेची कथा आहे. या कथेत इतरही अनेक पात्र आहेत. त्यांच्या सोसायटीमधले त्यांचे शेजारी, टप्पूचे मित्र..अशी बरीच पात्रं या मालिकेत आहेत. परिवारासोबत बसून बघता येणारी ही मालिका असल्याने ती बरीच लोकप्रिय झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2021 7:22 pm

Web Title: fans cant keep calm as they trend hashtag jethalal on twitter share memes on dilip joshis birthday vsk 98
Next Stories
1 “लोक जिवंत राहोत अथवा नाही मात्र निवडणुकीच्या तयारीत उशीर होता कामा नये”; माजी IAS अधिकारी संतापला
2 तुम्हीच प्रश्न निवडा आणि उत्तरं लिहा; गोवा IIT मधील इंजिनियरिंग अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका जगभरात व्हायरल
3 आता आरोग्य सेतू अॅपवर दिसणार ब्लू टिक; लाँच केलं ‘हे’ नवीन फीचर
Just Now!
X