गुलाबजाम…नावच पुरेसं आहे. नाही का? आपल्याला मिठाईची आवड आहे की नाही याची पर्वा न करता, समोर आलेली गरम गुलाबजामची प्लेट नाकारणे कठीण जाते. देशभरातील गाव खेड्यापासून ते मोठाल्या शहरातील पंचतारांकित हॉटेलमधील ग्राहकांना आवडणारा गोड पदार्थ असलेल्या गुलबाजामचे आपण आतापर्यंत विविध प्रकार ऐकले, पाहिले आणि चाखले देखील असतील, म्हणजे त्यातील काला जामून, पाकातला गुलाबजाम, सुका गुलाबजाम इत्यादी. पण जर का तुम्हाला गुलाबजामची भाजी कोणी वाढली तर काय होईल? आणि पहिला आणि मुख्य प्रश्न असा आहे की, तुम्ही कधी न खालेल्या या भाजीची चव चाखायचा विचार कराल का? हो गुलाबजामची भाजी खरोखर आहे.

खरतर ट्विटर देखील यासाठीची तयारी पाहून गोंधळले आहे. एवढेच नाहीतर, गुलाबजामची भाजी असल्याचे ऐकल्यानंतर अनेक विभाग वेगवेगळ्या निष्कर्षांपर्यंत पोहचले देखील. आणि जेव्हा या गुलाबजामच्या भाजीचा फोटो ट्विटरवर पडला तेव्हा सुरू झाल्या एकापेक्षा एक भन्नाट कमेंट आणि ट्विटरवर चर्चा. या फोटोला ओळ दिल्या गेली की, दररोज, मी माझा मानवतेवरचा विश्वास काहीसा अधिक गमवत आहे.

पोस्ट व्हायरल झाली आहे आणि कमेंट सेक्शनमध्ये चर्चा देखील वाढली आहे. बहुतेकांनी ते पसंत केले, काहींनी ते पसंत केले नाही. “ही एक राजस्थानी डिश आहे आणि ती स्वादिष्ट आहे,” असं ट्विटमध्ये वाचण्यात आलं आहे. तर कमेंट सेक्शनमध्ये “जोधपुरात ही गोष्ट अगदी सामान्य आहे, फक्त एवढीच नाही तर रसमलाई देखील आहे. ती अतिशय मसालेदार आणि तूपात बनविलेले आहे. जर तुम्ही कधी जोधपूरला भेट दिली असेल तर प्रयत्न करा.” असेही वाचायला मिळाले आहे.