23 September 2020

News Flash

मोदी सरकारने बॅन केलेल्या ५९ चिनी अ‍ॅपना गुगलचाही दणका, घेतला हा निर्णय

गुगलने घेतला अत्यंत महत्त्वाचा निर्णय

मोदी सरकारने ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालत डिजिटल स्ट्राईक केला. आता बॅन करण्यात आलेल्या अ‍ॅपना गुगलनेही दणका दिला आहे. मोदी सरकारने बॅन केलेली ही अ‍ॅप गुगलने तात्पुरी ब्लॉक केली आहेत. कारण सरकारने बंदी घालूनही ही अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर दिसत होती. त्यामुळे गुगने हा निर्णय घेतला आहे. PTI ने या संदर्भातला ट्विट करत ही माहिती दिली आहे.

३० जूनच्या रात्री मोदी सरकारने टिकटॉक, हॅलो यांसह एकूण ५९ App वर बंदी घातली. पूर्व लडाखमध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर सीमेवर तणाव आहे. तसंच देशातून चीनला उत्तर देण्याचा सूर उमटला. त्या अनुषंगाने हा निर्णय मोदी सरकारने घेतला. काही दिवसांपूर्वीस भारतीय गुप्तचर यंत्रणांनी ५२ धोकादायक चिनी App संदर्भात इशारा दिला होता. भारताने या अॅपवर बंदी घालावी किंवा देशातील नागरिकांनी ही App वापरू नयेत असं आवाहन केलं होतं. दरम्यान भारत सरकारने ३० जूनच्या रात्री ५९ App वर बंदीच घातली.

चीनमधील या App वर बंदी घालण्यात आली तरीही गुगल प्ले स्टोअरवर ही अॅप्स दिसत होती. त्याच अनुषंगाने आता गुगलने ही सगळी चिनी अॅप्स ब्लॉक करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय तात्पुरत्या स्वरुपाचा आहे  असंही गुगलने म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 2:16 pm

Web Title: google has said it has temporarily blocked access to those apps that were still available on the play store in india even after the government banned 59 chinese apps scj 81
टॅग India China
Next Stories
1 बडवायझरचा कर्मचारी १२ वर्ष करत होता बिअर टँकमध्ये लघुशंका? काय आहे सत्य
2 इटलीमध्ये अस्वलाने केला बाप-लेकावर हल्ला, सुनावली मृत्यूदंडाची शिक्षा
3 मेथी समजून कुटुंबाने चूकून गांजाच्या पानांची भाजी बनवून खाल्ली अन्…
Just Now!
X