करोनाची आपत्ती ही ‘देवाची करणी’ (Act of God) असून यंदाही अर्थव्यवस्था आकुंचन पावणार आहे, असे सांगत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यांना वस्तू व सेवा कराची (जीएसटी) थेट नुकसानभरपाई देण्यास केंद्र हतबल असल्याचे गुरुवारी जणू कबूल केले. भरपाईपोटी राज्यांना रिझव्‍‌र्ह बँकेकडून किफायतशीर व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याचे दोन पर्याय केंद्राने दिले. दोहोंपैकी कोणता पर्याय स्वीकारायचा यावर विचार करण्यासाठी राज्यांनी सात दिवसांची मुदत मागून घेतली. मात्र या बैठकीमध्ये निर्मला यांनी ‘देवाची करणी’ म्हणजेच Act of God चा उल्लेख केल्यानंतर गुगलवर त्यासंदर्भातील सर्चचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. गुगल ट्रेण्डनुसार काल (गुरुवार, २७ ऑगस्ट २०२०) सायंकाळी जीएसटी परिषद संपल्यानंतर अचानक Act of God चा सर्च संदर्भातील आलेख उंचावलेला दिसून आलं आहे. विशेष म्हणजे यासंदर्भातील सर्वाधिक सर्च हे महाराष्ट्रामधून करण्यात आलं आहे.

नक्की वाचा >> ‘देवाच्या करणी’मुळे केंद्र हतबल… ‘मोदी तर विष्णूचा ११ वा अवतार’; महाराष्ट्रातील नेत्याचं ‘ते’ ट्विट व्हायरल

जीएसटी परिषद संपल्यानंतर या परिषदेमधील सितारामन यांनी व्यक्त केलेली चिंता आणि आकडेवारीसंदर्भातील बातम्या समोर आल्या. त्यामध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती Act of God ची. म्हणजे अगदी ट्विटरपासून ते बातम्यांपर्यंत सगळीकडे या तीन शब्दांची चर्चा पाहायला मिळाली. त्यामुळेच गुगल ट्रेण्डमध्ये दुपारनंतर या टर्मसंदर्भातील सर्च वाढल्याचे दिसत आहे.

जीएसची परिषदेनंतर Act of God सर्वाधिक प्रमाणात सर्च करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानी दिसून आला. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये Act of God हे शब्द मागील २४ तासांमध्ये देशातील इतर राज्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात सर्च झाले. Act of God सर्वाधिक सर्च करणाऱ्या राज्यांच्या यादीमध्ये  महाराष्ट्राखालोखाल दिल्ली, कर्नाटक, आसाम आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या अनुक्रमे दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांक लागतो, असं गुगल ट्रेण्डच्या आकडेवारीवरुन दिसून येतं.

नक्की वाचा >> मोदी सरकारसमोर अर्थसंकट गडद; GDP च्या तुलनेत सरकारी कर्जाचा आकडा ९१ टक्क्यांवर जाणार


याच Act of God संदर्भातील रिलेटेड टर्म्स म्हणजेच संबंधित विषयांमध्ये अर्थमंत्री निर्माला सितारामन, वस्तू व सेवा कर (जीएसटी), अर्थव्यवस्था, नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान,  आकुंचन यासारखे गोष्टींचा समावेश आहे. म्हणजेच Act of God हे शब्द कोणत्या विषयांची संबंधित गोष्टींसाठी शोधले गेले हे या यादीमधून समजते.


दरम्यान करोनाचे संकट हे देवाची करणी असल्याचे सांगत सरकारने नुकसानभरपाई देण्यास हतबल असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मात्र त्याचवेळी भरपाईपोटी राज्यांना रिझव्‍‌र्ह बँकेकडून किफायतशीर व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याचे दोन पर्याय केंद्राने दिले. दोहोंपैकी कोणता पर्याय स्वीकारायचा यावर विचार करण्यासाठी राज्यांनी केंद्र सरकारकडून सात दिवसांची मुदत मागून घेतली.

नक्की वाचा >> केंद्र सरकार HAL मधील हिस्सा विकण्याच्या तयारीत; प्रक्रियेला सुरूवात

Act of God चा अर्थ काय?

Act of God ही टर्म प्रामुख्याने विम्यासंदर्भात वापरली जाते. तसेच कायदेशीर बाबींमध्येही ही वापरली जाते. ढोबळपणे या टर्मचा अर्थ सांगायाचा झाल्यास एखादी घटना घडल्यानंतर त्या घटनेसाठी कोणालाच जबाबदार धरता येत नाही. ती घटना घडून जाणे हे निर्सगामुळे होतं आणि त्याला कोणीच काही करु शकत नाही असं सांगण्यासाठी Act of God चा वापर करतात. याचवरुन बॉलिवूडमध्येही ओ माय गॉड नावाचा अक्षय कुमार आणि परेश रावल यांचा चित्रपट चांगलाच गाजला होता.