करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या देशभरामध्ये लॉकडाउन सुरु आहे. २५ मार्चपासून सुरु झालेल्या लॉकडाउनच्या काळामध्ये १४ एप्रिल रोजी वाढ करण्यात आली आहे. ३ मे पर्यंत हा लॉकडाउन सुरु राहणार आहे. मात्र लॉकडाउनच्या या कालावधीमध्ये घराबाहेर पडण्यास बंदी असल्याने अनेकजण टाइमपाससाठी इंटरनेटचा आधार घेत आहेत. मग अगदी जुन्या फोटोंवर कमेंट करणं असो, नॉमिनेट करण्याचे चॅलेंज असो किंवा पबजी असो, अनेकजण इंटरनेटवरच टाइमपास करताना दिसत आहेत. मात्र आता अनेकांना मागील काही आठवड्यांपासून नेटवर तोच तोच टाइमपास करुनही कंटाळा आला आहे. त्यामुळेच आता नेटचा वापर ज्ञान मिळवण्यासाठी आणि काहीतरी भन्नाट माहिती मिळवण्यासाठी केला जात आहे. सोशल नेटवर्किंगवरील काही अकाऊंटवरुन अशापद्धतीची भन्नाट माहिती दिली जात आहे. ही आगळीवेगळी माहितीही चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. सध्या असेच एक ट्विट व्हायरल झालं आहे. हे ट्विट आहे जिराफ हा जगातील सर्वात उंच प्राण्यांपैकी एक असणारा प्राणी झोपतो तरी कसा?

काय तुमच्या डोक्यातही विचारचक्र फिरु लागलं की नाही? सर्वात लांब मान असणारा प्रामुख्याने आफ्रिका खंडात अढळणारा हा प्राणी खरच कसा झोपत असेल असा प्रश्न आता वरील काही ओळी वाचून तुम्हालाही पडला असेलच. खरं तर जिराफ हा सध्याच्या जगात वेगळ्याच ग्रहावरून आलेला प्राणी भासतो. त्याची लांब मान, उंची यामुळे हा प्राणी सर्वाच्या कुतूहलाचा विषय ठरला आहे. त्याची सुंदर कातडी आणि अंधश्रद्धा यामुळे या प्राण्यांची शिकार होते. जिराफ हा शांत प्राणी आहे. कळपातील श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी नरांमध्ये जी मारामारी होते त्यात ते एकमेकांच्या मानेला विळखा घालून डोक्याने टक्कर देतात आणि यात हरलेला नर माघार घेतो. मात्र एवढा उंच प्राणी झोपत कसा असेल अशा प्रश्न सहाजिकपणे अनेकांना पडतो. हे कुतुहल इतकं आहे की तुम्ही गुगलवर केवळ ‘how does giraffe’ एवढचं टाइप केलं तर ऑटो सजेशनमध्ये sleep हा शब्द येतो. म्हणजेच जिराफ कसा झोपतो यासंदर्भात सर्वाधिक सर्च केलं जातं असं दिसून येतं.

Documentary is The art of storytelling
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : गोष्ट सांगण्याची कला…
mira road, Woman Raped, Forced to Convert to Islam, case register against Six Accused, with obscene pictures money extorted, naya nagar police, mira road news, crime news, police,
तरूणीवर बलात्कार, केस कापून केले विद्रुप; मुस्लीम धर्म स्वीकारण्याची सक्ती केल्याचा आरोप
Itishree thinking about What do I really want is very important in relationship
इतिश्री : ‘मला नेमकं हवंय काय?’
Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?

तर याचसंदर्भातील एक ट्विट सध्या व्हायरल झालं आहे यामध्ये जिराफ कसं झोपतं हे दाखवण्यात आलं आहे. उंच मान अल्याने जिराफ मान आपल्याच पाठीवर ठेऊन झोपतं. अशाच झोपेत असणाऱ्या दोन जिराफांचे फोटो एका अकाऊंटवरुन ट्विट करण्यात आले असून ते सध्या व्हायरल होत आहेत.

अवघी सात हाडे..

जिराफाच्या मानेपासून शेपटीपर्यंत फक्त ७ हाडे असतात त्यावर या लांबलचक मानेचा डोलारा उभा असतो. जिराफाच्या पायाचे हाड तिथे ठेवलेले आहे. या मजबूत आणि जड हाडाचा धसका त्याच्यावर हल्ला करणारे प्राणी घेतात. जिराफाची एक अचूक लाथ त्या प्राण्याला कायमची जायबंदी करू शकते.