News Flash

Viral Video : या नववधूला आवडतात ‘चीप थ्रिल्स’!

लग्नातला असा हटके व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल

युट्युबवर तिचा व्हिडिओ ट्रेंड होत आहे

हल्ली लग्नात संगीत हा प्रकार तसा बऱ्यापैकी परिचयाचा झाला आहे. वरातीत तर नाचगाणं होतं, पण लग्न मंडपात धुमाकूळ घालण्याची मज्जाच काही और आहे. तेव्हा अनेक जण खास लग्न मंडपातच डान्स शो वगैरे ठेवतात. पण हा ही ट्रेंड आता जुना झालाय. हल्ली जमाना आहे तो हटके काहीतरी करण्याचा, तेव्हा तुमच्याही घरात लगीन घाई असेल आणि तुम्हीही हटके काहीतरी करण्याच्या तयारीत असाल तर मग तुमच्यासाठी हा व्हिडिओ चांगला पर्याय ठरू शकतो. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये नवऱ्यामुलीचा ‘बोल्ड आणि ब्युटीफुल’ अंदाज तुम्हालाही वेड लावेल.

आता भारतीय नववधू म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर उभी राहते ती नखशिखान्त नटलेली, डोक्यावर पदर घेतलेली, थोडीशी लाजरी मुलगी. पण या नववधूने साऱ्या संकल्पनाच बदलल्या आहेत म्हणूनच की काय अनेकांना तिचा बोल्ड अंदाज जास्तच पसंतीस पडला आहे. फार फार तर आपल्या लग्नात त्याच त्याच बॉलिवूड गाण्यांवर नाचणारी वधू तुम्ही पाहिली असेल पण तिने मात्र या गाण्यांपेक्षा पसंती दिली ती सियाच्या ‘चीप थ्रिल्स’ या गाण्याला. आणि या गाण्यावर ती चक्क हॉट पँटवरच नाचली. तेव्हा या मॉडर्न नववधूचा हा हटके अंदाज अनेकांना आवडला आहे. युट्युबवर तर तिचा व्हिडिओ ट्रेंड होत आहे. युट्युबच्या ट्रेंडिग लिस्टमध्ये हा व्हिडिओ तिसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत २५ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे तर फेसबुकवरही तो मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2017 6:19 pm

Web Title: indian bride dance on sias cheap thrills song
Next Stories
1 जवानांसाठी या वृद्ध जोडप्याने देऊ केली आयुष्यभराची कमाई!
2 VIRAL VIDEO : अबब! व्हॅनमध्ये कोंबले चक्क ४० प्रवासी
3 Viral Video : या जगण्यावर शतदा प्रेम करावे!