मी भारताचा नागरिक आहे असे आपण अगदी सहज म्हणतो. पण आपण कितव्या क्रमांकाचे नागरिक आहोत याचा कधी तुम्ही विचार केलाय का? नाही ना? तर संविधानानुसार विचार केला तर आपण म्हणजेच कोणतीही सामान्य व्यक्ती भारताचा २७ व्या क्रमांकावरील नागरीक असतो. आता हे कसे काय? तर संविधानातील तरतूदीनुसार पहिल्या २६ क्रमांकांवर भारतातील महत्त्वाच्या पदांवरील व्यक्ती भारतीय नागरिक असल्याचे म्हटले आहे.

शाळेत असताना आपण पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे नागरिक राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती असतात हे शिकलेलो असतो. मात्र त्यापुढे कोण याबाबत आपल्याला फारशी माहिती नसते. तर तिसऱ्या क्रमांकावर पंतप्रधान, देशाचा चौथ्या क्रमांकाचा नागरिक राज्यपाल (स्वतःच्या संबंधित राज्यात) आणि पाचव्या क्रमांकावर देशाचे माजी राष्ट्रपती असतात. याशिवाय सहाव्या क्रमांकापासून २६ व्या क्रमांकापर्यंत खालील पदांवरील व्यक्ती असतात.

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
sleep fundamental right
Right to Sleep : भारतात झोप हा खरंच मूलभूत अधिकार आहे का?
islamic information center marathi news, islam information
माणसाला माणसाशी जोडणारा एक फोन नंबर…
disagreement between joe biden benjamin netanyahu marathi news
विश्लेषण: गाझावरून अमेरिका-इस्रायल मैत्री संपुष्टात येईल का? यूएन ठरावातून स्पष्ट संकेत?

६. देशाचे सरन्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष

७. केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य, राज्यांचे मुख्यमंत्री, निती आयोगचे उपाध्यक्ष, माजी पंतप्रधान, राज्यसभा आणि लोकसभेचा विरोधी पक्ष नेता

८. भारतातील मान्यताप्राप्त राजदूत, मुख्यमंत्री (स्वत:च्या राज्याबाहेर), राज्यपाल (स्वत:च्या राज्याबाहेर)

९. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश

१०. राज्यसभेचे उपाध्यक्ष, उपमुख्यमंत्री, लोकसभेचे उपसभापती, निती आयोगातील सदस्य, संरक्षण विभागाशी निगडीत इतर मंत्री

११. अॅटर्नी जनरल, मंत्रिमंडळ सचिव, उप-राज्यपाल (केंद्रशासित प्रदेशांसह)

१२. तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख

१३. असाधारण राजदूत आणि पूर्णाधिकार प्राप्त मंत्री

१४. राज्यांचे चेअरमन आणि राज्य विधानसभेचे सभापती, हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश

१५. राज्यांचे मंत्रिमंडळ सदस्य, केंद्र शासित राज्यांचे मुख्यमंत्री, दिल्लीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, केंद्रातील उपमंत्री

१६. लेफ्टनंट जनरल आणि प्रमुख अधिकारी

१७. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष, अनुसूचित जाती-जमातीच्या राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष, हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश (स्वत:च्या राज्याबाहेर)

१८. कॅबिनेट मंत्री (स्वत:च्या राज्याबाहेर), राज्यांच्या विधानसभेचे सभापती आणि अध्यक्ष (स्वत:च्या राज्याबाहेर), राज्यांच्या विधानसभेचे उपाध्यक्ष, राज्यांचे मंत्री

१९. केंद्रशासित राज्यांचे मुख्य आयुक्त, केंद्रशासित राज्यांचे उपमंत्री, केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभेचे उपाध्यक्ष

२०. राज्यांच्या विधानसभांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष (स्वत:च्या राज्याबाहेर)

२१. खासदार

२२. राज्यांचे उपमुख्यमंत्री (स्वत:च्या राज्याबाहेर)

२३. लष्कराचे कमांडर, व्हाइसचीफ आणि इतर महत्त्वाचे अधिकारी, राज्य सरकारचे मुख्य सचिव, अल्पसंख्याक आयागोचे आयुक्त, अनुसूचित जाती-जमाती आयोगांचे आयुक्त, अल्पसंख्याक आयोगातील सदस्य, राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे सदस्य

२४. उप राज्यपालांच्या रँकशी समकक्ष अधिकारी

२५. भारत सरकारचे अतिरिक्त सचिव

२६. भारत सरकारचे संयुक्त सचिव, मेजर जनरल रँकशी समस्क रँकचे अधिकारी