News Flash

युवराजच्या घरी आला नवा पाहुणा!

इन्स्टाग्रामवर शेअर केला फोटो

कुटुंबातील सर्वात लहान आणि गोंडस सदस्य असं लिहित युवीनं आपल्या इन्स्टा स्टोरीवर कोकोचा फोटो शेअर केला आहे

क्रिकेटर युवराज सिंगने आपल्या घरात आलेल्या नव्या पाहुण्याच्या फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा पाहुणा दुसरा तिसरा कोणी नसून तपकिरी रंगाचा छोटासा श्वान आहे. युवीनं या नव्या पाहुण्याला ‘कोको’ असं नाव दिलंय. अर्थात त्याच्या तपकिरी रंगावरून युवीनं त्यांचं ‘कोको’ असं नामकरण केलं असावं.

सेल्फीचा नाद भोवला, रेल्वेच्या धडकेत मुलगी गंभीर जखमी

International tea day : चहाबद्दलच्या या रंजक गोष्टी माहितीये का?

‘आमच्या कुटुंबातील सर्वात लहान आणि गोंडस सदस्य’ असं लिहित युवीनं आपल्या इन्स्टा स्टोरीवर कोकोचा फोटो शेअर केला आहे. युवीकडे आणखी एक श्वान आहे. अनेकदा त्याच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टद्वारे तो आपल्या लाडक्या श्वानाचे फोटो शेअर करत असतो. फक्त युवीलाच श्वानाबद्दल अधिक प्रेम आहे. असं नाही. तर भारतीय संघातील विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी यांनाही श्वानबद्दल विशेष प्रेम आहे. अनेकदा तेदेखील आपल्या लाडक्या श्वानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2017 5:00 pm

Web Title: meet coco cutest member of yuvraj singhs family
Next Stories
1 अस्खलित इंग्रजीमुळे गर्भवती भारतीय महिलेला व्हिसा नाकारला?
2 Video : भारतातल्या ‘या’ रेस्तराँमध्ये वेटरऐवजी यंत्रमानव देणार सेवा
3 International tea day : चहाबद्दलच्या या रंजक गोष्टी माहितीये का?
Just Now!
X