30 November 2020

News Flash

Video : इथे नावानं नाही तर धून गाऊन हाक मारतात

असं एक गाव जिथे कोणालाही नाव नाही पण गावात जन्मलेल्या प्रत्येक माणसाची विशिष्ट अशी धून आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

‘नावात काय आहे?’ असं आपण म्हणतो, पण हेच नाव आपल्याला वेगळी ओळख देतं. पण, तुम्हाला माहितीये मेघालयात असं एक गाव आहे जिथे कोणालाही नाव नाही. आता नावच नाही म्हटल्यावर लोक ऐकमेकांना हाक कशी मारत असतील असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. चला तर मग जगाच्या पाठीवर असणाऱ्या अशा एका गावाबद्दल जाणून घेऊयात जिथे लोक एकमेकांना नावानं नाही तर विशिष्ट धून गाऊन हाक मारतात.

मेघालयाच्या निसर्गरम्य कुशीत काँगथांग हे गाव वसलं आहे. या गावात जन्मलेल्या प्रत्येक माणसाची विशिष्ट अशी धून आहे. ही धून म्हणजेच त्याचं नाव होय. त्यामुळे जर संवाद साधायचा असेल तर या विशिष्ट धूननं त्या माणसाला बोलावलं जातं. एएनआयच्या माहितीनुसार मुलं जन्मला आल्यानंतर त्याची आई विशिष्ट नावाची धून तयार करते. आणि ही धून पुढे त्या मुलाची ओळख होते. मुलाला नावानं हाक मारण्यापेक्षा या धूननंच हाक मारण्याची पद्धत इथे आहे.

आजूबाजूच्या गावातील लोक ही जूनी परंपरा अजूनही जपत आहे. विशेष म्हणजे काही मुलांच्या धून या बॉलिवूड गाण्यांपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2018 4:25 pm

Web Title: meghalaya village people use unique tunes instead of names to communicate
Next Stories
1 …आणि तरुणाला वाचविण्यासाठी हत्तीने घेतली पाण्यात उडी
2 ‘ही’ आहे जगातील सर्वात महागडी सँडल, किंमत वाचून थक्क व्हाल
3 सतत टोमणे मारणाऱ्या पतीला वजनदार पत्नीचं ‘बॉडी बिल्डर’ होऊन उत्तर
Just Now!
X