विश्वचषक २०१९ स्पर्धेमध्ये भारताचा जलद गती गोलंदाज मोहम्मद शामी चांगला चमकला आहे. मैदानावर दमदार कामगिरी करणाऱ्या शामीच्या अडचणी मैदानाबाहेरील एका कृतीमुळे वाढण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षीच शामीची पत्नी हसीन जहाँने त्याच्यावर विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोप केले होते. या आरोपांनंतर शामीवर चहुबाजूंने टिका झाली होती. मात्र या प्रकरणाच्या चौकशीनंतर त्याला बीसीसीआयने क्लीन चीट दिली होती. याच सगळ्या गोंधळामधून स्वत: सावरत शामीने यंदाच्या विश्वचषकात दमदार कामगिरी केली. मात्र आता पुन्हा एकदा शामी टिकेचा धनी ठरताना दिसत आहे. अनेकांनी तर या स्क्रीनशॉर्टमुळेच शामीला मागील दोन सामन्यामधून वगळण्यात आल्याचे म्हटले आहे.

मोहम्मद शामीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊण्टवरुन एका अनोळखी मुलीला गुड आफ्टरनून असा मेसेज पाठवल्याचे स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाले आहेत. शामीने ज्या मुलीला मेसेज केला आहे तिनेच हा स्क्रीन शॉर्ट ट्विटवर शेअर केला आहे. तसेच आपल्याला मेसेज करणारा व्यक्ती खूप लोकप्रिय असल्याचे तिने शामीच्या फॉलोअर्सच्या संख्येवरुन ओळखले. ‘एवढा लोकप्रिय खेळाडू मला असे मेसेज का करतोय’ असा सवाल तिने स्क्रीनशॉर्ट शेअर करताना विचारला आहे. ‘कोणी मला सांगू शकेल का हा क्रिकेटपटू ज्याला १४ लाखांहून अधिक लोक फॉलो करतात तो मला मेसेज का पाठवत आहे,’ असं या ट्विटमध्ये सोफियाने म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त ‘क्रिकट्रॅकर’ या वेबसाईटने दिले आहे.

हा स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाला असून अनेकांनी यावरुन शामीची खिल्ली उडवली आहे. अनेकांनी तर हा स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाल्यामुळे वाद टाळण्यासाठी शामीला संघातून वगळल्याचे तर्क लावले आहे. तर काहींनी हा स्क्रीनशॉर्ट खोटा असल्याचे म्हटलं आहे. पाहुयात काय आहे नेटकऱ्यांचे म्हणणे

मागील दोन सामन्यात शामी नसल्याचं कारण

…म्हणून वगळले

शामीला एकटं वाटतय

एडिटींग छान जमलयं

ती कुठे असते?

वाइड डिलेव्हरी

न्यूझीलंडसाठी आनंदाची बातमी

दरम्यान, मागील दोन सामन्यांमधून शामीला वगळण्यात आले आहे. भारताचा मुख्य गोलंदाज भुवनेश्वर कुमार जखमी झाल्यामुळे शामीला संघात संधी मिळाली. अफगाणिस्ताविरुद्धच्या आपल्या पहिल्याच सामन्यात शामीने हॅटट्रीक घेत भारताला निसटता विजय मिळवून दिला. त्यानंतरच्या विंडीजविरुद्धच्या सामन्यामध्ये त्याने चार विकेट्स घेतल्या. तर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पाच विकेट्स घेतल्या. सध्या २०१९ च्या विश्वचषकामध्ये शामीच्या नावावर १४ बळी आहेत.