News Flash

Video : पैशांच्या पाकिटाचे माकड काय करते पाहाच

सोशल मीडिया व्हायरल

हिल स्टेशन म्हटले की तिथे माकडे आलीच. मग कधी पर्यटकांच्या हातातील चणे-फुटाणे ओढून घेणाऱ्या, तर कधी टपला मारणाऱ्या खट्याळ माकडांचा अनुभव आपल्यातील अनेकांनी घेतला असेल. ही माकडे कधी मस्ती म्हणून तर कधी चिडून काय करतील याचा नेम नाही. चीनमधील माकडांचा असाच एक व्हिडिओ नुकताच व्हायरल होत असून तो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. माऊंट एमी या चीनमधील एका प्रसिद्ध पर्यटनस्थळावर ही घटना घडली आहे. यामध्ये एका माकडाच्या हातात पैशांचे पाकिट आहे, अर्थातच त्याने कोणत्यातरी पर्यटकांकडून हिसकावून घेतले असेल.

आता इतक्यावरच ही गोष्ट थांबत नाही तर हे माकड एका कठड्यावर बसून या पाकिटातील पैसे काढते. त्या नोटा आजूबाजूला काढून फेकूनही देते. ते पैसे आहेत, त्याची किंमत याबाबत त्या माकडाला काहीच घेणेदेणे नाही. त्याला त्या पैशाची किंमतही नसावी. त्याच्यासोबत असणारी आणखी ३ माकडेही या माकडाच्या आजुबाजूला फिरताना दिसत आहेत. पैशाचा नोटा माकड काढून फेकत असल्याने मागे असणारे लोक ओरडत असल्याचाही आवाज येत आहे. ही सगळी घटना उपस्थित असणाऱ्यांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेरात कैद केली आहे. आणि अतिशय कमी वेळात ती सोशल मीडियावर व्हायरलही झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2018 4:55 pm

Web Title: monkey snatches tourists wallet throws away all the cash in it see the video
Next Stories
1 विमानाच्या लँडींगचे कारण ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही
2 श्रीमंत शहरांच्या यादीत मुंबई जगात १२ व्या स्थानावर
3 फेकन्युज : नानांच्या नावाखाली..
Just Now!
X