News Flash

मुकेश अंबानींची ‘जीवनरक्षक कार’, किंमत ८.५ कोटी

कारच्या दरवाज्यांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने खास प्लेट्स बसविण्यात आल्या आहेत. कारमध्ये VR7 बॅलिस्टिक सुरक्षा देण्यात आली आहे.

मुरेश अंबानी कारमध्ये बसतांना. या कारवर लॅण्ड माइन्सचादेखील प्रभाव होत नाही.

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळख असलेल्या मुकेश अंबानींच्या जीवनशैलीचे अनेकांना आकर्षण आहे. असे म्हणतात, श्रीमंत व्यक्तीचे जीवन हे असुरक्षिततेने ग्रासलेले असते. त्यामुळेच मुकेश अंबानीदेखील स्वत:च्या सुरक्षेबाबत जागरूक असतात. त्यांच्याकडे एक खास कार आहे. या गाडीवर बंदुकीतून सुटलेल्या गोळीचा अथवा लॅण्ड माइन्सचा काहीही परिणाम होत नाही. या गाडीला जीवनरक्षक कार म्हटल्यास वावगे ठरणार नाही. BMW ची 7 सिरीजची BMW आर्मर्ड 760 Li ही ती कार असून, मुकेश अंबानी याच कारमधून प्रवास करतात. तशी या कारची एक्स शोरूम किंमत जवळजवळ २.५ कोटी रुपये इतकी आहे. परंतु मुकेश अंबानी यांनी सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्या कारमध्ये खास बदल करून घेतल्याने गाडीची किंमतदेखील वाढली आहे. त्यांच्या BMW 760 Li ची किंमत ८.५ कोटी रुपये इतकी आहे.

त्यांच्या कारमध्ये VR7 बॅलिस्टिक सुरक्षा देण्यात आली आहे. कारच्या दरवाज्यांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने खास प्लेट्स बसविण्यात आल्या असून, सर्व विंडोज बुलेट प्रुफ आहेत. कारची बंदुक, ग्रेनेड आणि हाय इंटेंसिटीच्या १७ किलो वजनापर्यंतच्या TNT ब्लास्टवर टेस्टे केली गेली आहे. तसेच लॅण्ड माइन्सवरदेखील या कारची चाचणी करण्यात आली आहे. इंधन टाकी ‘सेल्फ सिलिंग फ्युएल टँक’ प्रकारातील आहे. त्यामुळे यात आग लागू शकत नाही. कारवर ‘केमिकल अॅटॅक’चा प्रभाव होऊ शकत नाही. केमिकल अॅटॅक झाल्यास कारमध्ये देण्यात आलेल्या ऑक्सिजन सिलिंडरचा वापर केला जाऊ शकतो. अनेक सुरक्षारक्षक प्रणालींनी सज्ज असलेल्या कारमधून मुकेश अंबानी प्रवास करतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 5:57 pm

Web Title: mukesh ambani bmw 760 li important facts about mukesh ambani car
Next Stories
1 Video : धोनीसाठी कायपण! मराठी चाहत्यानं तयार केलेलं गाणं ऐकलंत का?
2 ७०० वर्षे जुने झाड सलाइनवर
3 VIDEO : जेव्हा मस्करीची कुस्करी होते! अपघातातून सुदैवानं वाचली
Just Now!
X