22 November 2017

News Flash

Viral Video : रिट्रीट सेरिमनीदरम्यान पाकिस्तानचा जवान पडल्याने पिकला एकच हशा

पश्चाताप झाला तरीही रिट्रीट केली पूर्ण

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: July 17, 2017 3:23 PM

पाकिस्तानकडून भारतावर सातत्याने हल्ले केले जात आहेत. मागील काही दिवसांत ही परिस्थिती आणखीनच चिघळली आहे. पाकिस्तानी सैनिकांच्या क्षमतेचा अंदाज आतापर्यंत सर्वांनाच आला आहे. यातच आणखी एक भर पडली असून अतिशय हास्यास्पद आणि लज्जास्पद अशी घटना नुकतीच घडली आहे. आपल्या या चुकीची भरपाई ते कधी करु शकतील असे वाटत नाही.

पंजाबमधील हुसैनीवाला येथे साजरा करण्यात रिट्रीट समारंभात मानवंदना देण्यासाठी दोन्ही देशांचे जवान उपस्थित होते. यावेळी नागरीकही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. ही मानवंदना देत असताना पाकिस्तानचा एक जवान अतिशय जोशात पुढे आला आणि अचानक खाली पडला. हा समारंभ पाहण्यास मोठी गर्दी असल्याने भारतीय नागरीकांनी ही घटना पाहताच मोठा हशा पिकला. इतकेच नाही तर पाकिस्तानचा जवान अशापद्धतीने खाली पडल्याने आनंदाने भारताच्या नागरीकांनी टाळ्याही वाजवायला सुरुवात केली. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर खूप व्हायरल झाला आहे.

सौजन्य – इंडिया टिव्ही

या जवानाची मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवली गेली. इतकेच नाही तर त्याचा व्हिडिओ काढला आणि तोही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. मात्र अशाप्रकारे सर्वांसमोर इतक्या मोठ्या समारंभात खाली पडल्यावरही हा जवान पुन्हा उभा राहिला आणि त्याने आपली रिट्रीट पूर्ण केली. मात्र आपल्या या चुकीचा पश्चाताप त्याच्या चेहऱ्यावर सहज दिसून येत होता.

याआधीही याचठिकाणी अशाप्रकारची लाजीरवाणी घटना घडली होती. जेव्हा दोन्ही देशांचे सैनिक आपापल्या देशांचे ध्वज घेऊन उभे होते तेव्हा दोन्ही देशांचे जवान एकदुसऱ्याच्या जवळ येतात. यावेळी पाकिस्तानी सैनिकाचा हात भारतीय सैनिकाला लागल्याने त्यांच्यात काहीशी हाणामारी झाली होती. भारतीय जवानाने पाकिस्तानी जवानाला अतिशय चोख प्रत्युत्तर दिले होते. यावेळी दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी मधे पडत हा वाद मिटवला होता.

First Published on July 17, 2017 3:05 pm

Web Title: pakistani soldier during beating retreat ceremony must watch funny video