31 March 2020

News Flash

वाढदिवस विराट कोहलीचा, ट्रोल झाले रवी शास्त्री ! जाणून घ्या कारण…

नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नुकतच वयाच्या ३१ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. बांगलादेश दौऱ्यातून विश्रांती घेतलेला विराट कोहली आपली पत्नी अनुष्का शर्मासह भूतानमध्ये आहे. वाढदिवशी विराटच्या आजी-माजी सहकाऱ्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवर विराटसोबतचा एक फोटो पोस्ट करत त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

मात्र या फोटोवरुन नेटकऱ्यांनी रवी शास्त्री यांनाच ट्रोल केलं आहे.

दरम्यान बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत भारत सध्या १-० ने पिछाडीवर आहे. दुसरा सामना गुरुवारी राजकोटच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यावर पावसाचं सावट असल्यामुळे भारत या मालिकेत बरोबरी साधतो का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2019 12:59 pm

Web Title: party on indian coach ravi shastri becomes butt of all jokes on virat kohlis 31st birthday psd 91
Next Stories
1 मॅच पाहायला आला ८ फूट ३ इंची अफगाणी, पण भारतात पोहोचताच झाली ‘गोची’!
2 64MP कॅमेरा! ‘रेडमी नोट 8 प्रो’खरेदी करण्याची पुन्हा संधी
3 Video: आचारसंहिता संपल्यावर उघडले वाईन शॉप आणि त्यानंतर काय झाले पाहा
Just Now!
X