पंतप्रधान मोदी शनिवारी हिमाचलमधील अटल बोगद्याचे उद्घाटन केलं. हा बोगदा समुद्रसपाटीपासून १० हजार फूट उंचीवरचा महामार्गावरील जगातील सर्वात लांब बोगदा आहे. मनाली ते लेह हे अंतर त्यामुळे ४६ कि.मी.ने कमी होणार असून प्रवासाचा कालावधी चार ते पाच तासांनी कमी होणार आहे. पंतप्रधान मोदींबरोबरच या सोहळ्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सुद्धा उपस्थित होते. मात्र या सोहळ्यासाठी उपस्थित राहलेल्या पंतप्रधान मोदींच्या एका कृतीवरुन सध्या सोशल नेटवर्किंगवर जोरदार चर्चा सुरु आहे.  मनाली ते लाहौल-स्पिती या भागांना जोडणाऱ्या या ९.०२ कि.मी. लांबीच्या बोगद्याचे उद्घाटन करण्यासाठी आलेले मोदी हे रिकाम्या बोगद्यामध्ये कोणीही नसताना कोणाला हात उंचावून दाखवत होते असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

पीर पांजाल पर्वतराजीत ३ हजार मीटर म्हणजे १० हजार फूट उंचीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बांधणी करण्यात आलेल्या या बोगद्याचे उद्घाटन करण्यासाठी पोहचलेले पंतप्रधान बोगद्यामधून जाताना हात उंचावून अभिवादन करत होते. मात्र बोगद्यामध्ये कोणीच नव्हते तर मोदी नक्की कोणाला हात करत होते असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे. हा प्रश्न उपस्थित करणारे अनेक ट्विट फोटो आणि व्हिडिओंसहीत पोस्ट करण्यात आले आहेत. पाहुयात नेटकऱ्यांचे नक्की म्हणणे काय आहे…

Maharashtra Board Class 10th and 12th Result 2024 Date Time in Marathi
१०वी १२वीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी! ‘या’ तारखेला निकाल लागण्याची शक्यता; कसा पाहाल? जाणून घ्या
haryana school bus accident
हरियाणातील स्कूलबस अपघात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; शाळेच्या मुख्यध्यापिकेसह तिघांना अटक
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका
Atishi slams bjp
‘कथित मद्य घोटाळ्यातील पैसा भाजपाकडेच गेला, जेपी नड्डांना अटक करा’; ‘आप’ नेत्याचा खळबळजनक आरोप

१) रिकाम्या बोगद्यात कोणाला हात दाखवताय?

२) हात दाखवून ते मोदी वेव्ह तयार करत होते

३) तुलनाही केली

४) यांचं म्हणणं काय आहे बघा

५) ते क्रिकेटपटू असते तर

६) भविष्यात त्या बोगद्यातून जाणाऱ्यांना हात दाखवत आहेत

७) त्यांच्या बेस्ट फ्रेण्डला…

८) कोणला हात दाखवत आहेत?

९) चित्रपटच वाटतोय

१०) कॅमेरा दिसल्यावर हात हलतो

११) दल सरोवर भेटीदरम्यानचा फोटो

१२) नका त्यांना ट्रोल करु

१३) बोगदे मे कौन था?

१४) हीच का ती मोदी वेव्ह

१५) बोगद्याला हात करतायत का?

१६) त्यांना बरं वाटत नव्हतं का?

१७) आयपीएलवाल्यांकडून मदत घ्यायची ना

१८) तो एक प्रयत्न होता

१९) एकच नंबर… पण हात दाखवताय कोणाला?

२०) भक्तांसाठी हीच मोदी वेव्ह

२१) ते याच बद्दल बोलत होते, आपल्यालाच कळलं नाही

२२) एकमेव

२३) ते नाटक अन् हे काय?

२४) रिकाम्या ठिकाणी हात दाखवणारे

२५) सहा महिन्यांनी बाहेर पडल्यावर

एकंदरितच या सर्व ट्विटवरुन मोदी नक्की कोणाला अभिवादन करत होते हा प्रश्न अनेकांना पडल्याचे दिसत आहे. यासंदर्भात अगदी व्हेरिफाइड अकाऊंटवरुनही ट्विट करण्यात आलं आहे हे विशेष.