News Flash

महिलेचा बँक बॅलेन्स पाहून चोराने परत केले पैसे

चाकूचा धाक दाखवत लुटलेल्या महिलेचा बँक बॅलेन्स पाहिल्यानतंर चोराने पैसे परत केल्याची अजब घटना समोर आली आहे

महिलेचा बँक बॅलेन्स पाहून चोराने परत केले पैसे

चाकूचा धाक दाखवत लुटलेल्या महिलेचा बँक बॅलेन्स पाहिल्यानतंर चोराने पैसे परत केल्याची अजब घटना समोर आली आहे. चीनमध्ये ही घटना घडली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून व्हिडीओ व्हायरल झाला आहे. महिलेचे पैसे परत करणाऱ्या या चोराचं सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे.

हेयुआन शहरातील आयसीबीसी बँकेत हा प्रकार घडला आहे. महिला एटीएममधून पैसे काढत असताना चोर तिच्या मागून येते आणि चाकूचा धाक दाखवतो. महिला एटीएममधून काढलेले 2500 युआन त्याच्याकडे सोपवते. यानंतर चोर तिला एटीएम कार्ड स्वाइप करत बँक बॅलेन्स दाखवण्याची मागणी करतो. महिलेच्या खात्यात काहीच पैसे नसल्याचं पाहून चोराचं मन बदलतं आणि तो लुटलेले पैसे पुन्हा परत करतो.

सीसीटीव्हीत चोर बँक बॅलेन्स पाहिल्यानंतर पैसे परत करतो आणि हसत हसत तेथून निघून जाताना दिसत आहे. चोराने मोठं मन दाखवलं असलं तरी पोलिसांपासून तो वाचू शकला नाही. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2019 9:36 am

Web Title: robber returns money after checking bank balace
Next Stories
1 स्वत:च्या लग्नात उशिरा पोहोचूनही टाळ्यांचा गजरात स्वागत
2 गुगल क्रोमचे हे पाच अफलातून फिचर्स तुम्हाला माहित आहेत का?
3 जालियानवाला हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी हा क्रांतिकारक झळकला हॉलिवूडच्या पडद्यावर….
Just Now!
X