भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुली त्याच्या फलंदाजीच्या शैलीबरोबरच आता कॉमेंन्ट्री बॉक्समधील फटकेबाजीसाठीही लोकप्रिय झाला आहे. असाच एक किस्सा घडला भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना पहिल्या दिवशी पावसामुळे थांबवल्या नंतरच्या ब्रेक दरम्यान सुरु असणाऱ्या चर्चेमध्ये. सौरभच्या काळात त्याच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ स्लेजिंग करायचा का या प्रश्नाला सौरभने अगदी भन्नाट उत्तर दिले.

कार्यक्रमाची सूत्रसंचालक मयंकी लंगर हिने सौरभ गांगुलीला ‘तू जेव्हा क्रिकेट खेळायचा तेव्हा स्लेजिंगसंदर्भात भारतीय संघाची भूमिका काय होती?’ असा सवाल केला. भारताचा माजी फलंदाज आणि एकेकाळचा संघ सहकारी व्ही. व्ही. एस. लक्ष्मण गांगुलीच्या बाजुला बसलेला असतानाही दादाने या प्रश्नाचे एकदम मजेशीर उत्तर दिले. ‘त्या काळात स्लेजिंग शक्य नव्हते कारण तेव्हा भारतीय संघामध्ये खूप सज्जन खेळाडू (जंटलमन) होते,’ असे उत्तर सौरभने या प्रश्नाला हसतच उत्तर दिले. पुढे बोलताना तो म्हणाला, ‘जर मी राहुल द्रविडला स्लेजिंग करायला सांगितले तर तो म्हणायचा, नाही.. नाही.. नाही.. क्रिकेटचा खेळ खेळण्याची ही योग्य पद्धत नाही. जर तुम्ही लक्ष्मणला सांगितले तर तो म्हणायचा नाही मी माझ्या फलंदाजीवर लक्ष्य केंद्रित केले आहे. सर्वात मजेदार गोष्ट म्हणजे तुम्ही सचिनला स्लेजिंग करायला सांगितलं तर तो मीड ऑनला उभा राहून मिड विकेटला उभ्या असणाऱ्या खेळाडूला स्टीव्ह वॉचे स्लेजिंग करायला सांगायचा. या अती सज्जनांमुळे स्लेजिंगची जबाबदारी त्यावेळी केवळ माझ्या आणि हरभजनच्या खांद्यावर होती.’ गांगुलीच्या या उत्तराचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

१)
पावसानंतरची सर्वात छान गोष्ट

२)
तेंडुकरला केले ट्रोल

३)
म्हणून दादा आहे खास

४)
दादा

५)
दिन बन गया

६)
मजेदार

विश्वचषक स्पर्धेमध्ये कॉमेंन्ट्री बॉक्समधूनही दादा चांगलीच शाब्दिक फटकेबाजी करताना दिसतोय. समालोचनादरम्यान गांगुलाने केलेली अनेक वक्तव्ये सोशल मिडियावर व्हायरल झालेली दिसतात.