जगातील सर्वात शक्तीशाली देशांपैकी एक असणाऱ्या रशियामध्ये मागील काही दिवसांपासून चर्चा आहे ती एका युएएफओबद्दल. मोस्कोमधील एका इमारतीवर दिसलेल्या युएफओसदृश्य ढगाच्या फोटो आणि व्हिडीओमुळे रशियातील नेटकऱ्यांनी वेगवेगळे तर्क वितर्क लावायला सुरुवात केली आहे. अनेकांच्या मते ही उडती तबकडी म्हणजेच युएफओ आहे तर अनेकांनी हा केवळ गोलाकार आकाराचा ढग असल्याचे म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी मोस्कोमधील अॅड्रोव्ह अॅव्हेन्यू या उंच इमारतीच्या वर हा तबकडी सदृश्य ढग दिसल्यानंतर तेथे उपस्थित अनेक लोकांनी आपल्या मोबाईल कॅमेरामधून या ढगाचे फोटो क्लिक केले. काहींनी या घटनेचा व्हिडीओ शूट करुन युट्यूब आणि ट्विटवर पोस्ट केला आहे.

पाहूयात काय म्हणाले आहेत लोक यासंदर्भात ट्विट करताना…

युट्यूबवर पोस्ट करण्यात आलेला व्हिडीओ

मोस्कोमध्ये अशाप्रकारे उडत्या तबकडीच्या आकाराचे ढग दिसण्याची ही पहिलीच घटना नाही. युट्युबवर मोस्को शहराच्या नावापुढे युएफओ टाकून सर्च केल्यास अनेक व्हिडीओ सापडतात ज्यामध्ये मोस्कोत वेगवगेळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी अशाप्रकारे गोलाकार आकाराचे ढग दिसल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.