गुगलने आज सोमवारी प्रसिद्ध कविता झांसी की रानी लिहिणाऱ्या भारतीय कवयित्री सुभद्रा कुमारी चौहान यांना त्यांच्या ११७ व्या जयंतीनिमित्त डूडलद्वारे सन्मानित केले आहे. डूडलमध्ये कुमारीजी पेन आणि कागद घेऊन साडीमध्ये बसलेल्या दिसतात. तर राणी लक्ष्मीबाई मागच्या घोड्यावर दिसून येतात आणि काही काहीजण देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात कूच करताना दिसून येत आहे. सुभद्रा कुमारी यांनी हिंदी कवितेत अनेक कलाकृती लिहिल्या असून, झाशी की रानी ही त्यांची सर्वात प्रसिद्ध रचना आहे. राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनाचे वर्णन करणारी ही कविता हिंदी साहित्यातील सर्वात जास्त पठित आणि गायलेल्या कवितांपैकी एक आहे.

सुभद्रा कुमारी चौहान यांचा प्रवास

चौहान यांच्या कविता आणि गद्य प्रामुख्याने भारतीय स्त्रियांनी लिंगभेद आणि जातिभेद यासारख्या अडचणींवर मात करण्यावर लक्ष केंद्रित करतात. त्यांच्या कवितेतून दृढ राष्ट्रवाद अधोरेखित होतो आणि हेच त्यांच्या कवितेचं अनोखेपण आहे. सुभद्रा कुमारी यांचा जन्म १६ ऑगस्ट १९०४ रोजी उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील निहालपूर गावातील एका राजपूत कुटुंबात झाला. त्यांनी प्रयागराजच्या क्रॉस्टवेट गर्ल्स स्कूलमध्ये सुरुवातीला शिक्षण घेतले आणि १९१९ मध्ये मिडल स्कूलची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी १९१९ मध्ये खंडवाच्या ठाकूर लक्ष्मण सिंग चौहान यांच्याशी वयाच्या १६ व्या  वर्षी लग्न केले आणि त्यांना ५ मुले होती. नंतर त्या जबलपूरला गेल्या.

Amar Singh Chamkila first wife recalls their final meeting
“त्यांनी अमरजोतशी लग्न केलं, पण…” अमरसिंग चमकीलांच्या खुनाबद्दल पहिल्या पत्नीचं विधान; म्हणाल्या, “मला त्यांचा खूप…”
Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
Raj Thackerey teaser
VIDEO : राज ठाकरे- अमित शाह यांच्या बैठकीत काय ठरलं? शिवतीर्थवरून मिळणार उत्तर, पाहा पाडवा मेळाव्याचा टीझर!
Buldhana lok sabha
बुलढाणा : नरेंद्र खेडेकर-हर्षवर्धन सपकाळ यांच्यात दिलजमाई; आधी मैत्रीपूर्ण लढतीचे ट्विट आता फक्त मैत्री

चळवळीतील सहभाग

सुभद्रा आणि त्यांचे पती १९२१  मध्ये महात्मा गांधींच्या असहकार चळवळीत सामील झाले. नागपुरातील न्यायालयीन अटकेची त्या पहिली महिला सत्याग्रही होत्या आणि १९२३ आणि १९४२ मध्ये ब्रिटिश राजवटीच्या विरोधात आंदोलनामध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना दोन वेळा तुरुंगवास भोगावा लागला. त्या विधानसभेच्या सदस्य होत्या. १९४८ मध्ये नागपुरातून जबलपूरला परत जात असताना सोनी (Seoni) येथे कार अपघातात त्यांचा मृत्यू झाला, तेव्हा त्या विधानसभेच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी जात होत्या.

आज, चौहान यांच्या कविता अनेक भारतीय वर्गांमध्ये ऐतिहासिक प्रगतीचे प्रतीक म्हणून कायम आहे. तसेच भावी पिढ्यांना सामाजिक अन्यायाविरुद्ध उभे राहण्यास प्रोत्साहित करतात आणि देशाच्या इतिहासाला आकार देणारे शब्द म्हणून साजरे करतात.