तैवानमधला एक मजेशीर प्रसंग सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. एखाद्या व्यक्तीला त्या गोष्टीची किंमत नसली तर कशी फजिती होते याचे हे मजेशीर उदाहरण आहे. तैवानमधल्या एका नातवाने आपल्या आजीसाठी ब्रँडेड बॅग खरेदी केली होती. या हँडबॅगचा आजींनी असा काही उपयोग केला की ते पाहून तो पार चक्रावून गेला.

डी कार्ड या वेबसाईटवर तैवानच्या एका नातवाने किस्सा शेअर केला आहे. त्याच्या आजीची बॅग खराब झाली होती म्हणून आजींसाठी त्यांनी महागडी लुईस विटॉनची बॅग खरेदी केली. या बॅगची किंमत जवळपास ७३ हजार होती. एवढी महागडी बॅग दिल्याने नातू खूश होता. आजीला एवढी महागडी बॅग दिल्यावर तिलाही समाधान वाटेल असे त्या बिचा-याला वाटले. पण नंतर त्याने जे काही पाहिलं ते पाहून तो चक्रावून गेला असणार हे नक्की. या ७३ हजारांच्या बॅगेचा उपयोग आजी बाजारातून मासे आणि भाजी आणण्यासाठी करायच्या. जेव्हा नातू ब-याच महिन्यांनी आजींना भेटण्यासाठी गेला तेव्हा ‘तू दिलेली बॅग खूपच चांगली आहे, वॉटरफ्रुफ असून बाजारातून मासे, भाज्या आणण्यासाठी चांगली उपयोगी पडते’ असं कौतुक करायला त्या विसरल्या नाही. तिला बिचारीला तरी काय माहिती ही साधीसुधी बॅग नसून ७३ हजारांची जगप्रसिद्ध ब्रँडची बॅग आहे ती. नातवानेही आजींची चूक लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला नाही. उगाच आजीला का दुखवायंच म्हणा. त्याचा हा किस्सा अल्पवधीतच तैवानच्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Viral : शहर स्वच्छ ठेवण्यासाठी त्याने स्वत:च्या गाडीत गोळा केला कचरा

वाचा : गर्लफ्रेण्ड न मिळाल्याने त्याने केलं रोबोटशी लग्न!