दक्षिण आफ्रिकेमधल्या १० वर्षांच्या मुलला असा दुर्मिळ आजार झालाय की या आजारामुळे तो वाट्टेल ते खातो, अगदी टॉयलेट पेपरसुद्धा. कादाचित आपल्याला हे फार विचित्र वाटत असेल पण त्याला मात्र लहानपणापासूनच याची सवय झालीय. का़डेन बेंजामिन असं या मुलाचं नाव असून त्याचं आताच वजन हे ९० किलोंच्या आसपास आहे. प्राडर विलि सिंड्रोम असं या दुर्धर आजाराचं नाव आहे. लहानपणापासून तो या आजाराने ग्रस्त आहे. या आजारामुळे त्याला सतत काहीना काही खाण्याची सवय लागली आहे. कधीकधी त्याची भूक इतकी अनावर होते की तो समोर दिसेल ते खातो असंही त्याच्या आईने सांगितलं.

वाचा : ढिंच्याक पूजा परत येतेय?

अनेकदा खायला काही मिळालं नाही की टॉयलेट पेपरचा रोल तो खातो. कधीकधी जे पेपर दिसतील ते तोंडात टाकतो. त्याची परिस्थिती इतकी वाईट आहे की भुकेवर ताबा राहिला नाही की तो कचऱ्यातूनही  खायला काहीतरी शोधत असतो असंही त्याच्या आईनं डेली मेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. काडेनच्या या सवयीमुळे त्याच्या कुटुंबियांना सतत त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं. कधी कधी तर अनेक पदार्थ काडेनच्या हाती लागू नये म्हणून त्याची आई ते लपवूनही ठेवते. काडेन तीन वर्षांचा होता तेव्हा त्याचं वजन होतं ४० किलो. सुरूवातीला त्याला काय होतंय हे त्याच्या कुटुंबियांना कळतंच नव्हतं. त्याच्यावर अनेक उपचारही करण्यात आले पण याचा काहीच उपयोग झाला नाही.
अतिलठ्ठपणामुळे काडेनला श्वास घेण्यासही त्रास होतो. तो नळीद्वारे श्वास घेतो. त्याला हालचालही करता येत नाही.

वाचा : ‘बिक गई है गॉरमिंट’ म्हणणाऱ्या त्या महिलेचं जगणं केलं मुश्किल