अजगरासारख्या मोठ्या सापाची तेही कोणतेही हत्यार हाती न घेता शिकार करणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखेच आहे. पण आफ्रिकेच्या वाळवंटात असे काही पारंपारिक शिकारी आहेत जे अशा प्रकारचे जीवघेणे काम करतात. हे शिकारी चक्क आपल्या पायाचा वापर करून बिळात लपून बसलेले अजगर पकडतात. काही वर्षांपूर्वी आफ्रिकेच्या वाळंवटात अजगराची शिकार करताना काढलेला हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. यात आफ्रिकेच्या वाळवंटात राहणारे काही आदिवासी मिळून येथल्या स्थनिक प्रजातीच्या अजगराची शिकार करताना दिसत आहेत. त्यातल्या एकाने भांड्यात असणारा लेप आपल्या पायावर लावला आहे. त्यानंतर त्याने पायावर खबरदारी म्हणून पट्टीही गुंडाळली. खबरदारीचे हे उपाय करून झाल्यानंतर या शिका-याने जीवाची पर्वा न करता आपला बांधलेला पाय बिळात घातला. त्याचे सोबती काही दूर अंतरावर बसून त्या व्यक्तीच्या इशा-याची वाट बघत होते. काही मिनिटांत हा शिकारी आपल्या इतर साथीदारांना इशारा करतो. इशारा मिळाल्यानंतर सगळे पाय रोवून बसलेल्या शिका-याला बाहेर खेचताच. त्याचबरोबर या शिका-याचा पाय मांडीपर्यंत गिळलेला एक भला मोठा अजगर बिळातून बाहेर येतो. या शिका-याचे इतर साथीदार मिळून अजगराच्या जबड्यातून त्याचा पाय सोडवतात.

Gerard Lyons ने २०१२ मध्ये हा व्हिडिओ शेअर केला आहे आणि आतापर्यंत अजगराची शिकार करण्याचा हा थरार जवळपास ५५ लाख लोकांनी पाहिला आहे. आफ्रिकेच्या वाळवंटात राहणारे आदिवासी हे अशाचप्रकारे शिकार करतात. त्यामुळे एकदंर व्हिडिओमध्ये दिसणारा हा शिकारी अनुभवी असल्याचे समजेत. या शिका-याने ज्या सापाची शिकार केली आहे तो आफ्रिकन रॉक पायथॉन आहे. या सापांची गणना जगातील सगळ्यात लांब साप म्हणून केली जाते. हे साप जवळपास २० फूट लांब असतात. यातल्या काही प्रजाती या बिनविषारी देखील असतात.  हा व्हिडिओ कालामारी वाळवंटात चित्रित केला गेला आहे. वाळवंटात कोणत्याही प्रकारचे अन्न उपलब्ध नसल्याने मिळेल ते खाऊन येथील अनेक आदिवासी जमाती आपला उदरनिर्वाह करतात. कदाचित पोट भरण्यासाठीच त्यांनी या सापाची शिकार केली असेल.