सोशल मीडियावर प्राण्यांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात, आणि नेटकऱ्यांच्या ते पसंतीसही उतरतात. सध्या एका भटक्या कुत्र्याचा आणि ट्रॅफिक पोलिसाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये एक भटका कुत्रा रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. पण रस्त्यावर वाहनांची सतत वर्दळ असल्याने त्याला रस्ता पार करता येत नाही. बराच वेळ उभं राहून कुत्रा वारंवार रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतो, पण गर्दीमुळे त्याला ते शक्य होत नाही. तेवढ्यात जवळ असलेल्या एका ट्रॅफिक पोलिसाचं लक्ष या कुत्र्याकडे जातं, आणि स्वतःचं कर्तव्य लक्षात घेऊन हा पोलीस त्या कुत्र्याला रस्ता ओलांडता यावा यासाठी रस्त्यावरील सर्व ट्र्रॅफिक थांबवतो. ट्रॅफिक थांबल्यानंतर गाड्यांच्या समोर येऊन मागच्या हाताने कुत्र्याला रस्ता पार करण्याचा इशारा करताना हा पोलीस व्हिडिओमध्ये दिसत आहे.


ट्रॅफिक पोलिसाने कुत्र्यासाठी दाखवलेला दयाळूपणा नेटकऱ्यांना चांगलाच भावला असून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काही युजर्सनी हा व्हिडिओ मुंबईचा तर काहींनी तामिळनाडूचा असल्याचं म्हटलं आहे. पण हा व्हिडिओ नेमका कुठला आणि कधीचा आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही.