ट्विटरने गुरुवारी मोबाईल युजर्ससाठी नवी सेवा लाँच केली आहे. या सेवेचे नाव आहे ट्विट लाइट. या नव्या सेवेमुळे ट्विटरवरचा कन्टेन्ट ३० % अधिक जलद लोड होणार आहे त्यामुळे ७० % पर्यंत मोबालाईल डाटा वाचणार असल्याचा दावा ट्विटरने केला आहे.

ट्विटर लाइट हे एक प्रोग्रेसिव्ह वेब अॅप आहे. जे गुगलसोबत मिळून बनवले आहे. ज्यात अॅड्राईड मोबाईलवर नोटीफिकेशन पाठवण्यासाठी खास फिचर देखील असणार आहे. पण त्याचबरोबर डायरेक्ट मेसेज, सर्च बटन आणि फिड यासारखे फिचर्स देखील देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे डेस्कटॉप आणि मोबाईलवर हे दोन्ही ठिकाणी याचा वापर करता येणार आहे. यासाठी mobile.twitter.com वर लॉइन करावे लागणार आहे. मराठी, हिंदी, गुजराती, बंगाली, कन्नड अशा ४२ भाषांमध्ये ही सेवा वापरता येणार आहे. डेक्सटॉपवरून ट्विटर लाइट वापरल्यानंतर ४०% डाटा कमी वापरला जाणार आहे. सध्या आयपीएलचा हंगाम सुरू आहे आणि हिच वेळ साधून ट्विटर लाइट लाँच करण्यात आले आहे. त्यामुळे ट्विटच्या माध्यमातून टी२० विषयीच्या ताज्या अपडेट्स यातून मिळणार युजर्सना मिळणार आहे. यामुळे युजर्सच्या ७० टक्के मोबाईल डाटाची बचत होणार आहे, तर पेजेसही ३० पटीने जलद लोड होणार आहेत.

वाचा : व्हायरल होतेय २०० रुपयांची नोट

वाचा : जिओ टक्कर देण्यासाठी ही कंपनी देणार मोफत इंटरनेट