डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष झाले अन् अमेरिकेची सारी गणितंच फिरली. निवडणुकीच्या काळात ट्रम्प यांनी अमेरिकेकडे येणारे निर्वासितांचे लोंढे थांबवू असे वचन जनतेला दिले होते आणि सत्तेत आल्यावर त्यांनी ते करून दाखवलं. २७ जानेवारीला “प्रोटेक्शन ऑफ द नेशन फ्रॉम फॉरेन टेररिस्ट एंट्री इन टू द युनायटेड स्टेट्स’ या शीर्षकाच्या आदेशावर स्वाक्षरी केली. या आदेशानुसार इराण, इराक, सीरिया, येमेन, सुदान, लिबिया, सोमालिया या देशांच्या लोकांना अमेरिकेत येण्यास बंदी घातली गेली. यावर जगभरातून टीका झाली. लोकशाही मानणा-या अमेरिकन जनतेने याला विरोध केला. आंदोलने केलीत. अशात एक पोस्ट व्हायरल होत आहे. जी या अमेरिकेची आणखी एक बाजू जगाला दाखवते.

वाचा : अमेरिकेने नाकारले त्यांना आइसलँडने स्वीकारले

डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्वासितांवर घातलेल्या बंदीवर जगभरातून टिका होती आहे. कट्टर मुस्लिम देशांतून फोफावत चाललेला दहशतवाद अमेरिकेत येऊ नये म्हणून निर्वासितांवर बंदी घालत असल्याचे त्यांनी सांगितले. पण सारेच निर्वासित काही दहशतवादी नसतात असेही मानणारा एक वर्ग आहे. न्यूयॉर्कमध्ये असणा-या ‘किविआना’ हॉटेलचेही असेच म्हणणे आहे. या हॉटेलचे बिल प्रत्येकला विचार करायला लावेल. या बिलाच्या शेवटी ‘निर्वासितांनी अमेरिकेला महान बनवले आहे. त्यांनी तुमच्यासाठी जेवण बनवले आहे आणि ते तुमच्या ताटात वाढलेही आहे’ असे या बिलाच्या शेवटी लिहिण्यात आले. हे वाक्य नक्कीच प्रत्येक अमेरिकन नागरिकाला विचार करायला लावेल.

वाचा : कॅन्सरग्रस्त मुलाला उपचारासाठी तरी अमेरिकेत प्रवेश द्या! सिरियन वडिलांची ट्रम्प यांना विनंती

अमेरिका देश महान नक्कीच आहे. पण जगाच्या पाठीवरून आलेल्या अनेक लोकांनी हा देश महान बनवायला तितिकाच महत्त्वाचा वाटा उचलला आहे. नोकरीच्या शोधात, व्यवसायाच्या निमित्ताने जगभरातून लोक येथे आले आणि अमेरिकेचे होऊन गेले. त्यामुळे अमेरिकेला महान बनवण्यात निर्वासितांचा वाटाही मह्त्त्वाचा होता अशी भूमिका या हॉटेलची आहे म्हणूनच निर्वासितांविषयीचा पूर्वग्रह दूर करण्याचा या हॉटेलने छोटासा प्रयत्न केला आहे. हे बिल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.