News Flash

US : ‘एअरफोर्स वन’ची शिडी चढताना तीनदा पडले जो बायडेन, नंतर….; व्हायरल झाला Video

अटलांटाच्या दौऱ्यावर निघत असताना घडली घटना

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत बायडेन हे विमानाची शिडी चढताना तीन वेळेस पायऱ्यांवर पडताना दिसतायेत. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांसाठी असलेल्या एअरफोर्स वन या विशेष विमानाची शिडी चढताना तीन वेळेस पडल्यावरही बायडेन यांनी स्वतःला सावरलं आणि सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झाली नाही.

जो बायडेन शुक्रवारी आशियाई-अमेरिकी समुदायाच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी अटलांटाच्या दौऱ्यावर निघाले होते. अटलांटा जाण्यासाठी ते एअरफोर्स वन या अमेरिकी राष्ट्राध्यक्षांसाठी असलेल्या विशेष विमानाची शिडी चढत होते. चार-पाच पायऱ्या चढल्यावर मात्र अचानक त्यांचा तोल गेला आणि ते पायऱ्यांवरच पडले, बरं एकदा नाही तर त्यानंतर पुन्हा दोन वेळेस चढण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण दोन्हीवेळेस ते पडले. असा प्रकार त्यांच्यासोबत तीन वेळेस झाला. पहिले दोन वेळेस त्यांनी हाताचा आधार घेत स्वतःला सावरलं, पण तिसऱ्यांदा ते गुडघ्यावर पडले. तिसऱ्यांदा पडल्यानंतर मात्र त्यांनी स्वतःला सावरलं आणि दोन्ही हातांनी साइड रेलिंगचा आधार घेत ते विमानाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचले.

विमानाच्या प्रवेशद्वाराजवळ सॅल्यूट ठोकून ते विमानात बसण्यासाठी निघून गेले. दरम्यान, या घटनेनंतर जो बायडेन यांची प्रकृती १०० टक्के ठिक आहे अशी माहिती व्हाइट हाउसकडून माध्यमांना देण्यात आली आहे. ‘बायडेन शिडी चढत होते त्यावेळी खूप जोरात वारा सुरू होता, त्यामुळे त्यांचा तोल गेला असावा. पण ते पूर्णतः स्वस्थ असून १०० टक्के ठिक आहेत’, असं व्हाइट हाउसकडून सांगण्यात आलं आहे.


दरम्यान, तीन वेळेस पडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बायडेन यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात होती, त्यावर व्हाइट हाउसने बायडेन पूर्णपणे स्वस्थ असल्याचं सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2021 9:03 am

Web Title: watch video us president joe biden stumbles thrice trying to board air force one sas 89
Next Stories
1 Viral Video: बकरीसोबत ‘सेल्फी’ घेण्यात मग्न झाली होती तरुणी, पण अचानक…
2 ‘थर्ड अंपायरपेक्षा निवडणूक आयोग अधिक वेगाने निकाल देतं’; नेटकऱ्यांनी काढली पंचांचीच विकेट, पाहा Viral Memes
3 नेटकऱ्याने पोस्ट केला मुंबईत ‘लिट्टी-चोखा’ विकणाऱ्याचा संघर्षमय प्रवास, Zomato ने दिली ‘गुड न्यूज’
Just Now!
X