भारतासह जगभरात रविवारी संध्याकाळी अचानक व्हॉट्सअॅप बंद झाल्याने युजर्सना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. फोटो, व्हिडिओ शेअर करता येत नसल्याने तसेच स्टेट्सही अपडेट होत नसल्याने नेटकरी अक्षरशः वैतागले होते.

अनेक व्हॉट्सअॅप युजर्स याची ट्विटरवरुन तक्रार करीत होते. ट्विट करताना त्यांनी म्हटले की, मल्टिमीडिया मसेजेस जसे फोटो, व्हडिओ, जीआयएफ आणि स्टिकर्स शेअर होत नाही. व्हॉट्सअॅप स्टेट्सही काम करत नाही. त्याचबरोबर व्हॉट्सअॅपवरील कॉन्टॅक्ट पाहता येत नाहीत. तर काही युजर्सचे म्हणणे होते की, त्यांना व्हॉट्सअॅपवर आलेले फोटोज आणि व्हिडिओज शेअर करता येत आहेत. मात्र, ते त्यांच्या फोनमध्ये डाऊनलोड होत नाहीत.

डाऊन डिटेक्टरच्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपच्या स्टिस्टिममध्ये बिग स्पाइक व्हायरस आढळून आल्याने रविवारी संध्याकाळी ४.१५ वाजल्यापासून काही काळासाठी व्हॉट्सअॅप बंद पडले होते. त्यामुळे युजर्सना मेसेज पाठवणे आणि रिसिव्ह करताना अडचणी येत होत्या. भारत, युरोप, मलेशिया, इंडोनेशिया आणि ब्राझिल या देशांमध्ये व्हॉट्सअॅपला ही समस्या जाणवत होती.

ट्विटरवरुन व्हॉट्सअॅप युजर्स याबाबत माहिती देताना #Whatsappdown हा हॅटटॅग वापरत होते. त्यामुळे हा हॅशटॅग ट्रेंडिगमध्ये होता.