News Flash

तब्बल 8,620 mAh बॅटरी आणि 10.1 इंच डिस्प्ले, Xiaomi Mi Pad 4 Plus लॉन्च

याच्या मागील बाजूऐवजी पुढील बाजूला फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आलं आहे. याशिवाय 'आर्टिफिशियल इंटेलिजेंस फेस अनलॉक' फिचरही आहे

Xiaomi ने अॅन्ड्रॉइड टॅबलेट Mi Pad 4 Plus लॉन्च केला आहे. सर्वप्रथम जुन महिन्यात कंपनीने Mi Pad 4 लॉन्च केला होता. यामध्ये 8 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला होता. त्याच्या तुलनेत Mi Pad 4 Plus मध्ये 10.1 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच या टॅबलेटच्या मागील बाजूऐवजी पुढील बाजूला फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आलं आहे. याशिवाय ‘आर्टिफिशियल इंटेलिजेंस फेस अनलॉक’ हे फीचरही आहे. यामध्ये पावर बॅकअपसाठी तब्बल 8,620 mAhची बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत आणि उपलब्धता –
सध्या हा टॅबलेट केवळ चीनमध्ये लॉन्च करण्यात आला असून लवकरच भारतातही उपलब्ध होण्याची शक्यता आहे. चीनमध्ये या टॅबलेटच्या 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 1,899 चिनी युआन (जवळपास 19,300 रुपये) ठेवण्यात आली आहे. तर, 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 2,099 चिनी युआन (जवळफास 21,300 रुपये) ठेवण्यात आली आहे. 16 ऑगस्ट म्हणजे उद्याापसून चिनमध्ये या टॅबलेटची विक्री सुरू होत आहे. यामध्ये ब्लॅक आणि गोल्ड अशा दोन कलरचे पर्याय देण्यात आले आहेत. भारतातही या टॅबलेटची किंमत 20 ते 25 हजाराच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Mi Pad 4 Plus मध्ये फोटोग्राफीसाठी 13 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा (ओवी13855 सेंसर) आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. कनेक्टिविटीसाठी ड्युअल बॅंड वायफाय 802.11एसी, ब्ल्यू-टुथ 5.0, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे.

स्पेसिफिकेशन –
डिस्प्ले – 10.10 इंच
प्रोसेसर – ऑक्टा-कोर
फ्रंट कैमरा – 5-मेगापिक्सल
रिज़ॉल्यूशन – 1200×1920 पिक्सल
रॅम – 4 जीबी
ओएस – अॅन्ड्रॉइड 8.1 Oreo
स्टोरेज – 64 जीबी
रियर कॅमेरा – 13-मेगापिक्सल
बॅटरी क्षमता – 8620 एमएएच

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2018 6:49 pm

Web Title: xiaomi mi pad 4 plus launch
Next Stories
1 VIDEO : जेव्हा बाबा मुलासाठी आई होतो
2 ‘पतंजलि’च्या ‘किंभो अॅप’चं पुनरागमन, व्हॉट्स अॅपला देणार टक्कर
3 आधारकार्ड असेल तरच मिळेल म्हैसूर सिल्क साड्यांवर घसघशीत सूट
Just Now!
X