27 February 2021

News Flash

युवराज त्या प्रेमीयुगुलाच्या लग्नासाठी झाला उतावळा

'लग्न कधी करताय? मुलाखतीत विचारला प्रश्न

(@GT20Canada Photo)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला अष्टपैलू युवराज सिंग सध्या ग्लोबल टी२० कॅनडा या स्पर्धेत खेळत आहे. स्पर्धेदरम्यान युवराजने अष्टपैलू बेन कटींग आणि त्याची प्रेयसी एरिन हॉलैंड यांची चांगलीच गोची केली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये युवराजचा मस्तीखोर स्वभाव दिसतोय.

सामन्यापूर्वी बेन कटींगची प्रेयसी एरिन हॉलैंड त्याची मुलाखत घेत होती. प्रेयसी प्रियकाराची मुलाखत घेत असतानाच युवराज मध्येच आला. मुलाखतीमध्ये जाऊन युवराजने त्यांना लग्न कधी करणार?असा प्रश्न केला. युवराजचा प्रश्न ऐकून बेन कटींग आणि त्याची प्रेयसी हॉलैंड यांना हसू अनावर झाले. युवराजने लगेच तेथून पळ काढला. ग्लोबल टी२० कॅनडाने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर हा मजेदार व्हिडीओ शेअर केला आहे.

बेन कटींगने युवराजला या व्हिडीओवरून सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे. व्हिडीओ पोस्ट करत बेन कटींग म्हणाला की, ‘एरिन हॉलैंडसोबतची मुलाखत युवराजने लग्न कधी करणार असं विचारत खराब केली.’ युवराजने पुन्हा एकदा फिरकी घेत बेन कटींगला विचारले, मित्रा कधी आहे लग्न ?

युवराजच्या या प्रश्नावर बेन कटींगच्या प्रेयसी एरिन हॉलैंडने उत्तर दिलं आहे. ती म्हणाली की, ‘चिंता करू नकोस युवराज, बेन आणि मी तुला लग्नाला नक्की बोलवू. ‘ युवराजने बेन कटींगसोबत केलेली मस्करी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. त्यांचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

काल झालेल्या सामन्यात युवाराजच्या दमदार खेळीच्या बळावर टोरांटो नॅशनल्स संघाने दोन विकेटने सामना जिंकला. या सामन्यात युवराजने २१ चेंडूमध्ये तीन षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने ३५ धावा केल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2019 2:54 pm

Web Title: yuvraj singh asks funny question during interview of ben cutting and erin holland nck 90
Next Stories
1 जाणून घ्या पंतप्रधान मोदींना जंगल सफर घडवणाऱ्या बेअर ग्रिल्सबद्दलच्या खास गोष्टी
2 Man Vs Wild: पंतप्रधान मोदी झळकणार डिस्कव्हरी चॅनेलवर
3 धोनीच्या देशप्रेमाला वेस्ट इंडिजच्या ‘सॅल्यूट मॅन’चा सलाम
Just Now!
X