सध्या सोशल मीडियावर एका विचित्र आणि धक्कादायक घटनेची जोरदार चर्चा सुरु आहे. ज्यामध्ये शेजाऱ्याचा बदला घेण्यासाठी एका व्यक्तीने असे काही कृत्य केलं आहे, जे माणुसकीला काळीमा फासणारं आहे. शिवाय या व्यक्तीने केलेल्या अमानवी कृत्याबद्दल न्यायालयाने त्याला ६ महिन्याची शिक्षा देखील सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने शेजाऱ्याचा बदला घेण्यासाठी शेजाऱ्याच्या शेतात घुसून ११०० कोंबड्या मारल्या आहेत. चीनमध्ये घडलेल्या या घटनेने तेथील लोकांना धक्का बसला आहे तर अनेकांनी त्याच्या या कृत्याचा निषेध केला आहे.

‘द न्यूयॉर्क’च्या रिपोर्टनुसार, गु आडणावाच्या नावाच्या एका व्यक्तीचा त्याच्या शेजाऱ्यासोबत काही गोष्टीवरून वाद झाला होता. वादाच कारण म्हणजे, गुच्या शेजाऱ्याने त्याला न विचारता त्याचे झाड तोडले होते. यावरून दोघांमध्ये मारामारी देखील झाली होती. या घटनेनंतर गुने त्याच्या शेजाऱ्याचा बदला घेण्याचं ठरवलं.

हेही पाहा- इमारतीचे बांधकाम सुरु असतानाच अचानक स्लॅब कोसळला अन्…, धक्कादायक घटनेचा Video व्हायरल

शेजाऱ्याचा राग कोंबड्यांवर काढला –

मनात शेजाऱ्याचा बदला घेण्याचं ठरवलेला गु रात्रीच्या वेळी शेजारच्या पोल्ट्री फार्ममध्ये घुसला. मीडिया रिपोर्ट्सनुसार,तो अंधारात टॉर्च घेऊन जात होते. टॉर्चच्या प्रकाशामुळे कोंबड्या इकडून तिकडे पळू लागल्या. पोल्ट्री फार्मवर झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक कोंबड्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शेजाऱ्याने गु याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी गु याला अटक करून मृत कोंबड्यामुळे शेजाऱ्याचं जे नुकसान झालं त्याची भरपाई द्यायला सांगितली.

हेही पाहा- बायको फूल देत म्हणाली ‘I Love You’; आजोबांनी दिलं जबरदस्त उत्तर, Video पाहिल्यानंतर पोट धरुन हसाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर गु याने शेजाऱ्याला ३५ हजार ७३४ रुपये दिले. त्याच्यासोबत घडलेल्या प्रकाराने गुला खूप राग आला होता त्यामुळे त्याने शेजारच्या पोल्ट्री फार्ममध्ये जाऊन ६४० कोंबड्या मारल्याचंही समोर आलं आहे. या प्रकरणात, हेंगयांग काउंटीमधील न्यायालयाने गुला शेजाऱ्याच्या मालमत्तेचे जाणूनबुजून नुकसान केल्याबद्दल दोषी ठरवत त्याला ६ महिन्यांची शिक्षा सुनावल्याची माहिती समार आली आहे.