देशातील सर्वात महागडी भाजी म्हटलं की ती नेमकी कोणती भाजी असेल हे जाणून घ्यायची उत्सुकता झाली असेल. ही भाजी फक्त श्रावण महिन्यातच उपलबद्ध होते. शिवाय फक्त दोन राज्यातच ही भाजी विकली जाते. झारखंड आणि छत्तीसगड या दोन राज्यात ही भाजी विकली जाते. चिकन आणि मटनापेक्षा जास्त किंमत या भाजीची आहे. झारखंडमध्ये या भाजीला खुखडी (Khukhadi) असे म्हटलं जातं तर छत्तीसगड या भाजीला रुगडा म्हटलं जाते. झारखंडमध्ये ही भाजी १०० ते १२०० रुपये प्रतिकिलो रुपयांनी विकली जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाजारात आल्यानंतर ही भाजी लगेच विकली जाते. या भाजीमध्ये प्रथिनं जास्त आहेत. खुखडी आणि रुगडा या भाज्या मशरूम भाजीचीच एक प्रजाती आहे. ही भाजी जंगलात नैसर्गिकरित्या वाढते. दोन दिवसांत ही भाजी शिजवावी लागते. त्यापेक्षा जास्त वेळ लावल्यास खराब होते. छत्तीसगडमधील बलरामपूर, सूरजपूर, सुरगुजा, छत्तीसगडसह उदयपूरला लागून कोरबा जिल्ह्यातील जंगलात पावसाळ्याच्या दिवसात ही भाजी येते. या भाजीची मागणी पाहून जंगलात राहणारे ग्रामीण भागातील लोक या भाजीला जमा करुन ठेवतात. छत्तीसगढमधील अंबिकापूरसह इतर शहरी भागातील लोक याला कमी किमंतीत विकत घेऊन १००० ते १२०० रुपये किलो दराने विकतात. श्रावण महिन्यात दिवसला अंबिकापुर बाजारात पाच क्विंटलपेक्षा जास्त खुखडी मिळते.

दोन महिन्यांपर्यंत वाढणाऱ्या खुखरीची मागणी इतकी वाढते की जंगलात राहणारे ग्रामस्थ ते साठवून ठेवतात. छत्तीसगडमधील अंबिकापूरसह इतर शहरी भागात ही भाजी कमी किंमतीत विकत घेऊन ती १००० ते १२०० रुपयांपर्यंत प्रतिकिलो विकतात. या हंगामात दररोज अंबिकापूर बाजारात सुमारे पाच क्विंटल या भाजीचा पुरवठा होतो. खुखरी हा पांढर्‍या मशरूमचा एक प्रकार आहे. खुखडीच्या अनेक प्रजाती व वाण आहेत. लांब पट्ट्यातील सोरवा खुखडीला जास्त पसंती असते. त्याला भूडू खुखडी असे म्हणतात. भुडू हे मातीचे घर किंवा टेकडी असून जिथे ही भाजी पावसात वाढते. ही भाजी शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास फायदेशीर ठरते.

श्रावण महिन्यात झारखंड आणि छत्तीसगढमधील लोक चिकन आणि मटण खाणे बंद करतात. अशा परिस्थितीत दुर्गम भागातून मिळणाऱ्या खुखडी या भाजीची मागणी वाढते कारण चिकन आणि मटनला हा पर्याय चांगला मानला जातो. रांचीमध्ये ही भाजी प्रतिकिलो ७०० ते ८०० रुपये दराने विकली जाते. गुरेढोरे पाळणाऱ्या मेंढपाळ खुखडीची चांगली पारख करतात. खुखडी कोठे सापडेल हेदेखील त्यांना ठाऊक असते. भाजीशिवाय औषधे बनवतानाही याचा उपयोग होतो. असे सांगितले जाते की पावसाळ्यामध्ये वीज कोसळल्याने जमिनीच्या आतून पांढऱ्या रंगाची खोखडी बाहेर येते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1200 rupees vegetable expensive than chicken mutton fish rot in two days nck
First published on: 24-08-2020 at 11:49 IST