जंगले, धबधबे, मंदिरे आणि स्मारके असलेले छत्तीसगड हे भारतातील एक अतिशय आवडते पर्यटन स्थळ आहे. राज्यातील अनेक आश्चर्यांपैकी मेनपतमधील प्रसिद्ध ‘उल्टा पानी’ ही एक नैसर्गिक आश्चर्य देखील येथे पाहायला मिळते. हे ठिकाण पारंपारिक दृष्टिकोनाला आव्हान देते. निसर्गाची किमया पाहून तुम्हीही चक्रावून जाल.

नुकताच इंस्टाग्रामवर एका तरुणाने पोस्ट केलेल्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. व्हिडीओमध्ये तरुणाने भारतातिल अशा ठिकाणाबद्दल माहिती दिली आहे जिथे गुरुत्वाकर्षणही काम करत नाही. छत्तीसगढमध्ये असे गाव आहे जिथे पाणी उलट्या दिशेने वाहते. होय तुम्ही योग्य तेच ऐकत आहात.

इन्स्टाग्रामवर @jethi_vlogs ने हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये छत्तीसगडमधील मेनपत येथील आहे. येथे असे ठिकाण आहे जिथे पाणी गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने वाहत आहे. या ठिकाणाला उल्टापाणी म्हणून ओळखले जाते. व्हिडीओमध्ये तरुणाने दावा केले आहे की, एका पाण्याच्या छोट्या प्रवाहाजवळ उभा आहे. हा तरूण जिथे उभा आहे तिथे एका बाजूला चढ आहे तर दुसऱ्या बाजूला उतार आहे. गुरुत्वाकर्षणामुळे पाणी नेहमी उंचावरून खालच्या दिशेने वाहते पण येथे अगदी उलट घडले आहे. उल्टा पाणी या ठिकाणी पाणी उतारावरून चढ असलेल्या दिशेने वाहते आहे असा दावा तरुणाने केला आहे. हे सिद्ध करण्यासाठी तरुण त्या पाण्यात एक पान टाकतो जे पाण्याच्या प्रवाहाबरोबर उताराच्या दिशेने न जाता चढ असलेल्या दिशेने जाते कारण येथे पाण्याचा प्रवाह वरच्या दिशने वाहतो आहे. व्हिडीओ पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

हेही वाचा – “तेरे जैसा यार कहाँ!” जीवलग मित्राला सोडविण्यासाठी कुत्र्याची धडपड, व्हायरल व्हिडीओने जिंकले नेटकऱ्यांचे मन

पाणी गुरुत्वाकर्षणाचे उल्लंघन करत आहे का?

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेचे श्रेय ‘सायफन ॲक्शन’ (siphon action’) या तत्त्वाला दिले जाऊ शकते, ही फ्लुइड मेकॅनिक्समधील एक सुप्रसिद्ध संकल्पना आहे. या प्रक्रियेमध्ये पाणी गुरुत्वाकर्षणाला झुगारून जमिनीवर पाणी उताराच्या विरुद्ध उंच दिशेला वाहते.

उल्टा पाणी या ठिकाणी पाणी गुरुत्वकारर्षणाच्या विरुद्ध दिशेने वाहत आहे हा भ्रम तयार करण्यामध्ये तेथील प्रदेश महत्त्वाची भूमिका बजावते. दोन टेकड्यांमध्ये वसलेला हा प्रवाह वारा आणि भूप्रदेशाच्या नैसर्गिक गतिशीलतेचा फायदा घेत वरच्या दिशेने वाहत असल्याचा प्रभाव निर्माण करतो आणि उल्लेखनीय शक्तीने पाणी वरच्या दिशेने खेचतो.

हेही वाचा – “…अथवा पोकळ बांबूचे”, रिक्षावाल्याने पुणेरी पाटी लावून जोडप्यांना दिली ताकीद, पाहा Viral Photo

टेकड्यांमधील प्रवाहाचा दीर्घ भाग ‘सायफन ॲक्शन’ सुरू करतो, ज्यामुळे दोन भिन्न दाब निर्माण होतात ज्यामुळे पाणी लहान विभागात खेचले जाते. उताराच्या विरुद्ध दिशेने पाणी वेगाने वाहते ज्यामुळे गुरुत्वाकर्षणला जुगारत असल्याचा भ्रम निर्माण करतो.

हा व्हिडीओ लाखो लोकांना आवडला असून अनेकांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केला आहेय . “भारत हा न्यूटनसाठी नाही,” असे एका वापरकर्त्याने सांगितले. दुसरा म्हणाला “ते शक्य नाही. हे एक ऑप्टिकल इल्यूजन आहे आणि असे अनेक ठिकाणी होते. मला माझ्या सर्वेक्षणाच्या साधनावरही शंका आहे तिसऱ्या वापरकर्त्याने जोडले, “जर गुरुत्वाकर्षण उलटे काम करत असेल, तर तुम्ही आकाशात असता, पृथ्वीवर नाही.” चौथ्या वापरकर्त्याने टिप्पणी केली, “जवळच्या पर्वतांमुळे.. आणि स्थलांतरामुळे हा भ्रम निर्माण झाला आहे.”