आंध्र प्रदेशमध्ये वडिलांनी आपल्या नवविवाहित मुलीला अनोखी भेट दिली आहे. तेलगू परंपरेनुसार सध्या आषाढी महिना सुरु आहे. या दरम्यान, वडील आपल्या मुलीला भेट देत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये एका वडीलांनी मुलीला मोठ्या प्रमाणात मासे, भाज्या, लोणचे आणि मिठाई भेट म्हणून दिली. नवविवाहितांसाठी हा महत्वाचा महिना आहे. परंपरेनुसार या काळात नवीन वधू तिच्या पालकांकडून भेटवस्तू घेतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंध्र प्रदेशमध्ये वडिलांनी मुलीला दिलेली भेट एक चर्चेचा विषय बनला आहे. राजमुंदरी येथील प्रख्यात व्यावसायिक बतूला बलराम कृष्ण यांनी आपल्या मुलीला १२५० किलो मासे, १००० किलो भाज्या, २५० किलो किराणा सामान, २५० किलो लोणचे, २५० किलो मिठाई, ५० कोंबड्या, १० शेळ्या पुडुचेरीतील यनम येथे मुलीला पाठवल्या आहेत.

हेही वाचा – घरात घुसलेल्या कोब्राकडून कुटुंबाचा पाठलाग; धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

यानम येथील प्रसिद्ध उद्योगपतींचा मुलगा पवन कुमार यांनी नुकतेच बतूला बलराम कृष्णा यांची मुलगी प्रत्यूषा सोबत लग्न केले आहे. जोडप्याचा हा पहिला आषाढी मास आहे. म्हणून प्रत्युषाच्या वडिलांनी आपल्या मुलीला अनोखी भेट देण्याचा निर्णय घेतला. भेटवस्तूंनी भरलेला ट्रक प्रत्युषाच्या सासरच्या घरी पोहोचला तेव्हा त्यांनाही मोठा धक्का बसला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1250 kg fish 250 kg sweets10 goats strange gift from father to daughter srk
First published on: 20-07-2021 at 14:54 IST