Shocking video: शाळा म्हणजे ज्ञानाचं मंदिर आणि इथले शिक्षक विद्यार्थी आणि समाज घडवत असतात. घरात आईवडील तर शाळेत शिक्षक मुलांवर संस्कार करत असतात. पण याच ज्ञानाच्या मंदिरात शिक्षिकांनीच विद्यार्थ्यांसमोर धक्कादायक कृत्य केलं आहे. गुजरातमधी एका शाळेतील शिक्षकांनी आपापसात हाणामारी केल्याची घटना घडली आहे. मुख्याध्यापक आणि शिक्षक एकमेकांत भिडले असल्याची एक धक्कादायक बाब समोर आली आहे. त्याचा व्हिडीओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील नवयुग शाळेत ही घटना घडली आहे. मुख्याध्यापकांच्या डेस्कवर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याने संपूर्ण दृश्य रेकॉर्ड झाले आहे. मुख्याध्यापकाने आपल्या शाळेतील एका शिक्षकावर कसा हिंसाचार केला हे या व्हिडीओतून दिसत आहे. हितेंद्र ठाकोर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुख्याध्यापकाने गणित आणि विज्ञान शिक्षक राजेंद्र परमेर यांच्यावर शिकवणीच्या पद्धतीबद्दल वाद घातला त्यानंतर त्यांना मारहाण केली. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, गुजरातमध्ये शाळेचे मुख्याध्यापक आणि गणित आणि विज्ञान शिक्षक यांच्यातील भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे. फुटेजमध्ये भरूचमधील एका शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकाला वारंवार मारहाण करत असल्याची नोंद आहे, ज्यामुळे शिक्षण अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली. यावेळी या मुख्याध्यापकांनी २५ सेकंदात अक्षरश: १८ वेळा शिक्षकाच्या कानाखाली मारले आहे. एवढंच नाही तर मुख्याध्यापकांनी त्याचा एक पाय ओढून त्याला जमिनीवर ओढले आणि त्यानंतर त्याला सतत चापट मारली. यावेळी आजू-बाजूला असणाऱ्या इतर शिक्षकांनी मध्यस्थी करून वाद मिटवला.व्हिडीओच्या शेवटी शिक्षिकेला शिवीगाळ करून मुख्यध्यापक आपल्या जागेवर परत जात असल्याचे दिसत आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, मुख्यधापक परमेर यांच्यावर वर्गात शाब्दिक शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी याप्रकरणी तपास करत आहे.या प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या शिक्षकांची बदली करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

पाहा व्हिडीओ

https://twitter.com/NewsCapitalGJ/status/1888195951434887276

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांनीही संताप व्यक्त केला आहे. काहींनी तर या शिक्षकांना नोकरीवरुन काढून टाकण्याची मागणी केली आहे. दुसऱ्या युजरने प्रतिक्रिया देताना, शिक्षकच जर असे वागले तर मुलांवर काय संस्कार होणार असा सवाल केला आहे.