जगात असे अनेक लोक आहेत, ज्यांना कोणत्या ना कोणत्या गोष्टीची अ‍ॅलर्जी असते. यासाठी ते अनेक उपचार करतात किंवा या गोष्टींपासून संपर्क टाळ्यांचा प्रयत्न करतात. मात्र एखाद्या व्यक्तीला अशी गोष्टी पासून अ‍ॅलर्जी असेल ज्याकडे आपण अजिबात दुर्लक्ष करू शकत नसू तर? अमेरिकेतील एका महिलेला अशाच एका गोष्टीपासून अ‍ॅलर्जी आहे. ही गोष्ट म्हणजे पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती. नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया.

अ‍ॅलर्जी ही एक शारीरिक समस्या आहे. बहुतेक लोकांना कोणत्या ना कोणत्या गोष्टीची अ‍ॅलर्जी असते. लिंडिस जॉन्सन नावाच्या २८ वर्षीय महिलेला एक विचित्र अ‍ॅलर्जी झाली आहे. यामुळे तिला जमिनीवर उभे राहताच चक्कर येते आणि उलट्या होऊ लागतात. यामुळे शारीरिकदृष्ट्या स्वस्थ असूनही तिला या अ‍ॅलर्जीमुळे आपल्या बिछान्यावर पडून राहावे लागते.

जेवणासाठी आधार कार्ड दाखवा; वधूपित्याची वराच्या पाहुण्यांकडे अचंबित करणारी मागणी

लिंडिस जॉन्सनला विचित्र अ‍ॅलर्जी आहे, त्यामुळे ती जमिनीवर ५ मिनिटेही उभी राहू शकत नाही. ऐकायला विचित्र वाटत असलं, तरीही तिला खरं तर गुरुत्वाकर्षणाचीच अ‍ॅलर्जी आहे. यामुळे तिला उभं राहताच चक्कर येणे, उलट्या होणे अश्या समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणूनच तिला दिवसातील जवळपास २३ तास अंथरुणातच पडून राहावं लागतं. अंघोळीसाठीही तिला शॉवर खुर्चीचा वापर करावा लागतो.

Viral Video: बाईकवर स्टाईलमध्ये करत होता स्टंट, पोलिसांनी अशी अद्दल घडवली की चारचौघात…

डेली स्टारच्या वृत्तानुसार, अमेरिकेतील मेनमधील बांगोर येथे राहणारी लिंडसेला पूर्वी असा त्रास जाणवत नव्हता, ती नौदलात काम करत होती. तिला फेब्रुवारी २०२२ मध्ये या आजाराबद्दल कळलं. या आजाराला पोस्टरल टाकीकार्डिया म्हणतात. तिला जवळपास ७ वर्षांपासून उलट्या, चक्कर येणे, पाठदुखी, मूर्च्छा आणि खालच्या ओटीपोटात दुखणे यासारख्या लक्षणांनी ग्रासले होते.

सुरुवातीला हा तणाव आहे असे वाटले पण नंतर कळले की तिला गुरुत्वाकर्षणाची अ‍ॅलर्जी आहे. बीटा-ब्लॉकर्सच्या मदतीने तिला आता उलट्या होणे आणि मूर्च्छित होणे या समस्यांपासून सुटका मिळाली असली तरी ती आता घराबाहेर पडण्याचा विचारही करू शकत नाही.