scorecardresearch

Viral Video: बाईकवर स्टाईलमध्ये करत होता स्टंट, पोलिसांनी अशी अद्दल घडवली की चारचौघात…

असेही काही महाभाग असतात, ज्यांना वाहतुकीचे नियम सहजासहजी समजत नाहीत. तेव्हा मग पोलीस त्यांची चांगलीच खोड मोडतात.

Viral Video: बाईकवर स्टाईलमध्ये करत होता स्टंट, पोलिसांनी अशी अद्दल घडवली की चारचौघात…
छत्तीसगडमधील दुर्ग पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर मोटारसायकलवर स्टंट करणाऱ्या एका माणसाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. (ट्विटर)

लोकांना वाहतूक संदर्भातील नियमांबाबत जागरूक करण्यासाठी सरकार तसेच पोलीस प्रशासन कठोर परिश्रम करत असते. यासाठी अनेक पद्धतींचा अवलंबही केला जातो. मात्र असेही काही महाभाग असतात, ज्यांना सहजासहजी या गोष्टी समजत नाहीत. तेव्हा मग पोलीस त्यांची चांगलीच खोड मोडतात. याचा अनुभव नुकतंच छत्तीसगड येथे आला आहे.

छत्तीसगडमधील दुर्ग पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर मोटारसायकलवर स्टंट करणाऱ्या एका माणसाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये पाहू शकतो, एक तरुण दोन्ही पाय एका बाजूला ठेवून मोटारसायकल चालवत आहे. तसेच त्याने फक्त एका हाताने या बाईकचं हँडल धरलं आहे. २८ सेकंदाचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

रविवारी, २५ सप्टेंबरला शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ आतापर्यंत अडीच लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला हा तरुण भरधाव वेगाने बाईक चालवत आहे. दरम्यान, त्याचा मोबाईल बाईकच्या हँडलवर लटकवण्यात आला आहे.

जेवणासाठी आधार कार्ड दाखवा; वधूपित्याची वराच्या पाहुण्यांकडे अचंबित करणारी मागणी

यानंतर या पठ्ठ्याला दुर्ग पोलिसांनी ४,२०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. यामध्ये तो कान पकडून माफी मागतानाही दिसत आहे. व्हिडीओच्या अखेरीस नागरिकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा व्हिडीओ अतिशय मजेशीर असून नेटकऱ्यांनी यावेळी पोलिसांच्या कल्पकतेचे कौतुक केले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या