37 Commando Burned Alive: लाइटहाऊस जर्नालिज्मला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेला एक व्हिडिओ आढळला. भारतीय लष्कराच्या ३७ कमांडोना जिवंत जाळल्याचा दावा या व्हिडिओसह शेअर करण्यात येत होता. ही मूळ घटना ३० जानेवारी २०२४ ची आहे, जेव्हा कांगपोकपी आणि इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील सीमावर्ती भागात सशस्त्र हल्लेखोरांमध्ये झालेल्या चकमकीत २ लोक ठार झाले होते. मात्र आता हा व्हिडीओ एका भलत्याच दाव्यासह शेअर केला जात आहे. याबद्दल सविस्तर तपास केल्यावर पूर्ण सत्य समोर आले आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूया..

काय होत आहे व्हायरल?

X, ज्याला आधी Twitter च्या नावाने ओळखले जायचे, त्याचे युजर @ImrankhanISP1 यांनी व्हायरल क्लेम शेअर केला.

इतर वापरकर्ते देखील असाच दावा करत व्हिडिओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही InVid टूलवर व्हिडिओ अपलोड करून आमची तपासणी सुरू केली. रिव्हर्स इमेजमुळे ईस्ट मोजोने अपलोड केलेला व्हिडिओ आम्हाला सापडला.

हा व्हिडिओ शेअर करण्यात येत असलेल्या व्हिडिओ सारखाच होता.

हा व्हिडीओ ३१ जानेवारी २०२४ रोजी अपलोड करण्यात आला होता. वर्णनात नमूद केले होते: मंगळवारी कांगपोकपी आणि इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील सीमावर्ती भागात सशस्त्र हल्लेखोरांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जण ठार झाले आणि तीन जण जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले. मणिपूरमध्ये दुपारी दोनच्या सुमारास कडांगबंद भाग आणि त्यालगतच्या कौत्रुक टेकड्यांमधून गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. सगोलतोंगबा ममांग लेइकाई येथील मेश्नाम खाबा मेईतेई (२९) आणि कोनुंग लीकाई, पॅलेस कंपाऊंड येथील नोंगथोम्बम मिशेल सिंग (३२) अशी मृतांची नावे आहेत. त्यांचे मृतदेह RIMS शवागारात जमा करण्यात आले आहेत.

गुगल सर्च केल्यावर, आम्हाला या घटनेबाबत अजून बातम्या मिळाल्या.

https://www.thequint.com/news/india/manipur-violence-gunfight-imphal-west-death-toll-latest-news
https://www.hindustantimes.com/india-news/2-killed-3-injured-as-fresh-clashes-erupt-in-manipur-101706640604502.html

आम्हाला मणिपूर पोलिसांची एक पोस्ट सुद्धा आढळून आली.

तपासाच्या पुढील टप्प्यात आम्ही मणिपूर येथील उखरुल टाईम्सचे संपादक रोनरेई खाथिंग यांच्याशी फोन कॉलवर संपर्क साधला. त्यांनी लाईट हाऊस जर्नलिझमला माहिती दिली की अलीकडे किंवा भूतकाळात ३७ भारतीय सैन्य कमांडोना जिवंत जाळल्याची कोणतीही घटना घडलेली नाही. त्यांनी असे देखील सांगितले, हा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला. येथे दिसणारा सशस्त्र गट कुकी-झोमी गटांचा आहे ज्यांनी गेल्या आठवड्यात मायती गटांचा पाठलाग केला. त्यांनी उखरूल टाइम्स वर आलेल्या या घटनेची बातमी देखील आमच्यासोबत शेअर केली.

Fresh Violence in Manipur claims 2 lives, 3 others injured

हे ही वाचा << हिंदू कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या? बांगलादेशातील हत्याकांडाचं भीषण वास्तव; पैसे की धर्म, काय ठरलं कारण?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निष्कर्ष: मणिपूरमध्ये ३७ भारतीय लष्कराच्या कमांडोना जिवंत जाळण्यात आले नाही, व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे. पोस्टसह शेअर करण्यात आलेला व्हिडिओ कांगपोकपी आणि इंफाळ पश्चिमच्या सीमावर्ती भागात झालेल्या हिंसाचाराचा आहे.